शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यात आपले मुख्यालय थाटले. या कार्यालयाला बाळासाहेब भवन असे नाव देण्यात आले. कार्यालय अगदी चकाचक. काचेची तावदाने, चकचकीत खूच्र्या, आर्कषक पेंटींग, शुभ्रधवल रंग, चमकणारे दिवे असा या मुख्यालयाचा थाट आहे. अलिशान अशा मुख्यालयाची स्वच्छता कायम राहावी यासाठी पादत्राणे घालून कार्यालयात जाता येत नाही. पादत्राणे बाहेर काढण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. त्यासाठी एक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला आहे. इथपर्यंत सारे ठिक. पण कार्यालयात येणारे नेते व कार्यकर्त्यांना वेगळाच अनुभव येऊ लागला आहे. कारण आत जाताना बाहेर काढलेली पादत्राणे बाहेर आल्यावर गायब झाल्याचे प्रकार वाढले आहेत. पादत्राणे गायब होत असल्याने तेथे येणाऱ्या कार्यकर्त्यांचे अर्धे लक्ष पादत्राणांवर असते. पादत्राणे बाहेर काढण्याची सक्ती कशाला? हे काय मंदिर आहे का? अशी कार्यकर्त्यांची संतप्त भावना आहे.

काका विरोधात दादा, पण कोणता दादा ?

राजकीय क्षेत्रातील नेत्यांचा उल्लेख प्रामुख्याने त्यांच्या टोपण नावानेच केला जातो. कधी साहेब म्हटले जाते तर कधी अण्णा, बापू, दादा असाच उल्लेख कार्यकर्त्यांकडून केला जातो. निवडणुकीचा हंगाम आला तर दादा, बापू, अण्णा यांना चांगलाच भाव मिळतो. सांगलीच्या लोकसभेची भाजपची उमेदवारी विद्यमान खासदार संजय पाटील यांना मिळाली आहे. त्यांना अख्खा सांगली जिल्हाच नव्हे तर राजकीय क्षेत्रात काका या टोपणनावानेच संबोधले जाते. त्यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेचे पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी काँग्रेसचे विशाल पाटील हेही महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी अडून बसले आहेत. या दोघांनाही दादा म्हणून संबोधले जाते. यामुळे सांगलीच्या मैदानात ‘दादा’गिरी दिसणार हे स्पष्ट आहे मात्र कोणत्या दादांची दादागिरी शिपण्याची रंगत वाढवणार याची उत्सुकता सगळय़ांनाच लागली आहे.

MLA Nilesh Lanke resign
निलेश लंकेंनी लोकसभेसाठी अखेर राजीनामा दिला; भावूक होत म्हणाले, “पवार साहेबांना त्रास दिला…”
baba kalyani
अग्रलेख: तीन पिढय़ांचा तमाशा!
Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी
eknath shinde latest news in marathi, shrikant shinde marathi news
खासदारांच्या ‘कल्याणा’नंतरच मुलाची उमेदवारी, मुख्यमंत्री शिंदे यांची व्युहरचना

आम्ही नवरदेववाले, तुम्ही नवरीवाले..

जळगावचे शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या भाषणांमध्ये ग्रामीण भागातील उदाहरणांचा चपखल वापर करण्यासाठी प्रसिध्द आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी युती असताना भाजपचा कटू अनुभव जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला आला होता. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीवेळी मित्रपक्ष भाजपच्या उमेदवारांसाठी शिवसेनेने प्रामाणिकपणे मदत केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपने शिवसेना उमेदवारांसमोर बंडखोर उभे केले होते, अशी तक्रार करण्यात आली होती. त्यामुळेच या लोकसभा निवडणुकीत सावध झालेले गुलाबराव पाटील यांनी भाजपला, आता आम्ही नवरदेववाले आहोत आणि तुम्ही नवरीवाले आहेत, असे सुनावले. विवाह सोहळय़ात नवरदेववाले तोऱ्यात असतात तर, नवरीवाले नमते घेत असल्याने पाटील यांनी ही उपमा दिली. विधानसभेवेळी ते नवरदेववाले आणि आम्ही नवरीवाले राहू. एकमेकांना मदत करा, असा सल्ला देण्यास ते विसरले नाहीत.

(संकलन : विकास महाडिक, दीपक महाले, दिगंबर शिंदे)