वर्धा : माझा मतदारसंघ राज्यात सर्वात चांगला करून दाखवेन, असा निर्धार जार कुणी अर्ज दाखल करताच जाहीरपणे म्हणत असेल तर त्यासाठी तेवढा वकूब व धाडस पण लागते. वकूब नसून केवळ धाडस दाखविणे हास्यस्पदच ठरेल. पण ईथे तसे नाही. जो बोलतो तसे करून दाखविण्याची त्याची क्षमता त्याने तीन वर्षात दाखवून दिली असल्याचे लोकांना पाटल्याने त्याचा निर्धार टाळ्यांचा कडकडाट घेणारा ठरला. आता राज्यात गाजत असणाऱ्या आर्वी मतदारसंघाची ही बाब. ईथे विद्यमान आमदाराची तिकीट कापण्याची बाब गाजली.

आमदार केचे यांना कापून येणार कोण तर सुमित वानखेडे. हे वानखेडे भूमिपुत्र तर आहेच पण भाजपचे राज्यातील सर्वशक्तिमान नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातील ताईत. तीन वर्षांपूर्वी त्यांना फडणवीस यांच्या ओएसडी पदावरून सुट्टी देत आर्वीला पाठविण्यात आले. आजवर एक खेडेवजा लहान पण ऐतिहासिक शहर म्हणून गावचा परिचय. लोकमान्य टिळक यांनी भेट दिलेले. पण वानखेडे आले आणि आर्वी परत सर्वदूर पोहचले.

हेही वाचा >>> Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना राजकीय पाठबळ कोणाचे?; चंद्रपूर जिल्ह्यात एकच चर्चा

लोकसभा निवडणुकीची नरेंद्र मोदी यांची सभा आर्वीतच. त्यांचे संपूर्ण नियोजन करणार वानखेडे. विद्यमान आमदार केचे यांची एव्हाना घालमेल सूरू झाली असते. वानखेडे यांनी घोषणा करावी आणि केचे यांनी हे माझेच काम, असे म्हणत ते हाणून पाडायचे.  पुढे लोकसभा निवडणुकीत शहरात पक्षाचे दोन कार्यालय असण्याची बाब आर्वी भाजपात घडली. लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून वानखेडे यांना जबाबदारी मिळाली आणि केचेंना वानखेडे यांचे निर्देश पाळणे क्रमप्राप्त  ठरले.  भाजप आर्वीत भाकरी फिरविणार, हे लोकसभा निवडणुकीनंतर पक्के झाले. वानखेडे यांनी मशागत करून ठेवलीच होती. उमेदवारी मिळालीच. पण केचे बंडाचा झेंडा उभारून बसले. केचे गडकरी अनुयायी म्हणून गडकरी विश्वस्त सुधीर दिवे यांच्यावर केचे कोप शांत करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. पण केचे पडले पक्के राजकारणी.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात राज ठाकरे फोडणार प्रचाराचा नारळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस गडाला ध्वस्त करण्याची जबाबदारी त्यांनी एकहाती पार पडल्याचा इतिहास. तसेच पक्षाने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दिलेला उमेदवार मान्य नाही म्हणून स्वतंत्र उमेदवार देत पूर्ण पॅनलसह निवडणूक लढविणारा लढवैय्या.  त्यात झालेला पराभव, हे पण केचे यांना फार ताणण्यात कारण नसल्याचे आता आठवून देणारा. पण खुटी हलवून पक्की करायची म्हणून अडून बसल्यावर राज्यातील एकाही बंडखोराच्या वाट्याला नं आलेले अमित शहा यांच्या भेटीला चार्टर्डने जाण्याचे भाग्य केचेंच्या वाट्याला आले. हे सर्व कुणासाठी, तर सुमित वानखेडे यांच्यासाठी. राज्यातील इतर भाजप बंडखोर देवगिरी इथेच समाधान पावत शांत झाले. आता केचे पण त्यांच्यासाठी आनंदात काम करतील, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष सुनील गफाट देतात. या सर्व घडामोडीमुळे वानखेडे हे भाजपचे सर्वात लाडके उमेदवार अशी चर्चा सूरू झाली आहे.