संतोष प्रधान

महाविकास आघाडीबरोबर फारकत घेत तिसरी आघाडी स्थापन करून निवडणूक लढविण्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केल्याने ही आघाडी भाजप किंवा महायुतीच्या पथ्थ्यावर पडेल याचीच शक्यता अधिक आहे.

Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Bharat Jodo Abhiyaan
भारत जोडो अभियानाची निवडणूकपूर्व राजकीय मशागत आघाडीच्या पथ्यावर!
Do not participate in party campaign without consent confusion due Vanchits new Instructions
… तोपर्यंत मित्र पक्षाच्या प्रचारात सहभागी होऊ नका, वंचितच्या फतव्याने संभ्रम

गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फटका बसला होता. यातूनच यंदा वंचितला बरोबर घेण्याचा प्रयत्न झाला. गेल्या वर्षी वंचित आण शिवसेना गटात समझोता झाला होता. त्याच माध्यमातून वंचितचा महाविकास आघाडीत समावेश करण्याचे प्रयत्न झाले. पण वंचितच्या अटी व जागांची मागणी यातून आघाडी होणे कठीण होते. वंचितला अखेरच्या टप्प्यात पाच जागा देण्याची तयारी महाविकास आघाडीने दर्शविली होती. पण वंचितबरोबर आघाडी होऊ शकली नाही.

आणखी वाचा-ठाण्यात राजन विचारे यांचे शिंदे गटासमोर आ‌व्हान, कल्याणमध्ये उमेदवाराचा शोध सुरूच

महाविकास आघाडीबरोबर आघाडी होत नसल्याने प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. वंचित, मराठा व अन्य समाजांना एकत्र करून तिसरी आघाडी स्थापन करण्याची कल्पना आंबेडकर यांनी मांडली आहे. अशी तिसरी आघाडी स्थापन झाल्यास त्याचा फटका महाविकास आघाडीलाच बसू शकतो. कारण भाजप विरोधी मतांमध्येच विभाजन होणार आहे. तिरंगी लढतीत भाजपच्या पथ्थ्यावरच पडू शकतात. स्वत: प्रकाश आंबेडकर यांना तिरंगी लढतीचा फटका बसतो. कारण अकोला मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि वंचित अशी तिरंगी लढत झाल्यास भाजपच्या उमेदवाराला यश मिळते. गेल्या वेळी नांदेड, सोलापूर आदी काही मतदारसंघांमध्ये वंचितच्या मतविभाजनाचा काँग्रेसला फटका बसला होता.

आणखी वाचा-शिवसेनेच्या आक्रमकपणामुळे काँग्रेसची फरफट

वंचितने नऊ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. हे सर्व विदर्भातील उमेदवार आहेत.फक्त नागपूरमध्ये वंचितने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. विदर्भात तिरंगी लढती झाल्यास ते भाजपलाच फायदेशीर ठरेल. महायुतीला अपेक्षित अशाच सोंगट्या पटावर पडत असल्याची प्रतिक्रिया महायुतीच्या नेत्याने व्यक्त केली.महाविकास आघाडीबरोबर जागावाटपाची चर्चा फिसकटल्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी सारे खापर महाविकास आघाडीवर फोडले आहे. पण महाविकास आघाडीचे नेते आंबेडकर यांची एकूणच भूमिका लक्षात घेता आधीपासूनच आघाडीबाबत साशंक होते.

महाविकास आघाडीला आता महायुती आणि काही मतदारसंघांमध्ये वंचितच्या तिसऱ्या आघाडीचा सामना करावा लागेल. वंचितला गेल्या वेळप्रमाणेच मते मळू शकतात का, याचा अंदाज आघाडीचे नेते घेत आहेत. वंचितला मत म्हणजे भाजपचा फायदा यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रचारात जोर राहणार आहे. वंचितने स्वतंत्र लढण्याचे जाहीर केल्याने महायुतीच्या गोटात साहजिकच समाधानाचे वातावरण असताना महाविकास आघाडीच्या चिंतेत भर पडली आहे.