तृणमूल काँग्रेस (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांचे धाकटे बंधू बाबून बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील हावडा लोकसभा मतदारसंघातून प्रसून बॅनर्जी यांना पुन्हा पक्षाचे उमेदवार बनवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षा (BJP)मध्ये सामील होण्याच्या अटकळ नाकारल्या, परंतु हावडा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढविण्याचा विचार करीत असल्याचे सांगून त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं होतं. बाबून बॅनर्जी सध्या दिल्लीत आहेत. त्यानंतर सिलीगुडीतील रॅलीच्या मंचावरून ममता बॅनर्जी यांनी भावाबरोबरचे संबंध तोडत असल्याचे जाहीर केले.

ममता यांनी आज उघडपणे सांगितले की, “मी आणि माझे कुटुंबीय बाबून बॅनर्जींबरोबरचे आमचे सर्व संबंध तोडत आहोत. त्यानंतर तासाभरातच बाबून बॅनर्जी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दीदी आमच्यावर रागावणे हा त्यांचा आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले. मी दीदीला सोडून कुठेही जात नाहीये. तसेच मी हावडामधून निवडणूक लढवणार नाही. खरे तर मंगळवारपासून बाबून दिल्लीला गेले असून, ते भाजपामध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होती, मात्र बुधवारी दुपारी त्यांनी या सर्व वादावर पडदा टाकला.

man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

त्याचं झालं असं की, बाबून यांनी अपक्ष उमेदवार बनण्याची घोषणा केल्यानंतर ममतांनी बुधवारी सिलीगुडीमध्ये पत्रकार परिषद घेतली. तृणमूलच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता यांनी आपला धाकटा भाऊ बाबूनबरोबरचे संबंध तोडत असल्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, हावडा लोकसभा मतदारसंघात तृणमूलचा उमेदवार न बनता बाबून जे काही करीत आहेत किंवा बोलत आहेत, त्यामुळे संपूर्ण बॅनर्जी कुटुंब रागावलेले आहे. “मी थेट सांगतेय की, लोक जसजसे मोठे होतात, तसतसा त्यांचा लोभही वाढत जातो. ते आता कुटुंबातील सदस्य आहेत, असे मला वाटत नाही. मी त्यांच्याशी सर्व संबंध तोडत आहे. मला त्यांची अनेक कामे फार दिवसांपासून आवडत नव्हती. परंतु सगळं बाहेरून सांगता येत नाही. मी आज बोलत आहे. आमच्या कुटुंबातील सगळ्यांनाच त्याचा राग आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचाः CAAच्या माध्यमातून मतुआ समाजाची मतं वळवण्याचे भाजपाचे डावपेच

ममता यांनी हे सांगण्याच्या तासाभरापूर्वी बाबून यांनी हावडा सदर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या घोषणेवरून प्रश्न उपस्थित केला होता. पक्षाच्या उमेदवारांच्या यादीमुळे आपण निराश झाल्याचे ते म्हणाले. कारण त्यांचा सल्ला न मानता प्रसून बॅनर्जी यांना हावडामधून उमेदवार बनवण्यात आले आहे. ज्यांना तो आवडत नाही. तसेच लोकसभा निवडणुकीत ते उमेदवार होण्याच्या पात्रतेचे नाहीत, असेही त्यांना वाटते. कारण मतदारसंघाच्या विकासासाठी स्वत:च्या खासदार निधीचे वाटप प्रसून यांना पूर्ण करता आलेले नाही. ममतांच्या भावाने सांगितले की, त्याला प्रसून यांची ॲलर्जी आहे. बाबून म्हणाले, “जे पाचवी पास करू शकत नाहीत, त्यांना पदवीधर बनवले जात आहे. हावडामध्ये प्रसूनपेक्षा बरेच चांगले उमेदवार होते. अरुप रॉय, राजीव बॅनर्जी, राणा चटर्जी यांसारखे अनेक लोक आहेत, पण त्यांना उमेदवारी दिली जात नाही. पण त्या व्यक्तीला उमेदवार बनवण्यात आले आहे, जो लोकांना मान्य नाही, असे बाबून म्हणालेत. बाबून यांच्यानंतर ममतांनी त्याला उत्तर दिले.

हेही वाचाः लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी; कोणाकोणाला मिळाली संधी?

ममता सिलीगुडीच्या सभेत म्हणाल्या की, “तो आपले बालपण विसरला आहे. वडिलांचं निधन झाले तेव्हा तो अडीच वर्षांचा होता. मी माझ्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतली. मी तेव्हा ३५ रुपये कमवायचे. त्यातूनच त्याला शिकवले. त्यानंतर मी राजकारण करायला सुरुवात केली. असे काही लोक आहेत, ज्यांना काहीही न करता निवडणुकीत उभे राहायचे आहे. मला लोभी लोक आवडत नाहीत. हावडा जागेसाठी तृणमूलचे उमेदवार प्रसून बॅनर्जी आहेत आणि दुसरे कोणीही नाही.” ममतांच्या टिप्पणीनंतर बाबून म्हणाले की, अपक्ष उमेदवार होण्याबाबत आपण जे काही बोललो होतो, ते विधान मागे घेत आहोत. मी भाजपामध्ये प्रवेश करणार नाही. मी अपक्ष म्हणून कुठेही निवडणूक लढवणार नाही. ममता जे काही बोलल्या मी तो मला दिलेला आशीर्वाद समजतो, असेही त्यांनी सांगितले.

ममता बॅनर्जींच्या सात भावंडांमध्ये बाबून हा सर्वात धाकटा भाऊ आहे. ममता बॅनर्जी यांना पाच भाऊ आणि दोन बहिणी आहेत. वय वर्षे ५० असलेले बाबून २०११ मध्ये ममता पहिल्यांदा मुख्यमंत्री बनण्याआधी एक अनोळखी चेहरा होते. ममता बॅनर्जींच्या राजवटीत ते हळूहळू एक परिचित चेहरा म्हणून समोर आले. कोलकाता मैदान आणि बंगालच्या क्रीडा क्षेत्रात बाबून यांचा दबदबा होता. सध्या बाबून मोहन बागान फुटबॉल क्लबचे उपाध्यक्ष आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पश्चिम बंगाल विभागाचे अध्यक्ष आहेत.

टीएमसीच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “आम्हाला वाटले की हावडा महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून त्यांची निवड केली जाणार आहे. मात्र, परिसीमन विधेयक चार वर्षांहून अधिक काळ राज्यपालांच्या विचाराधीन असल्याने महापालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत. बहुधा बाबूनला वाटले की, त्याऐवजी पक्षाचे हावडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून त्यांना संधी दिली जाईल. प्रसूनला तिकीट मिळाल्यावर ते चिडले होते. ममता बॅनर्जींचा भाऊ असल्याशिवाय त्यांची दुसरी कोणतीही ओळख नाही. म्हणूनच बंडानंतर ते मागे हटले. ” ममता आणि त्यांचा पुतण्या अभिषेक (तिचा भाऊ अमित बॅनर्जीचा मुलगा) व्यतिरिक्त तिची एक मेहुणी कजारी ही कोलकाता महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत. दुसरा भाऊ कार्तिक बॅनर्जी राजकारणात आहे, पण फार मोठ्या पदावर नाही. अभिषेक टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, माझ्या राजकारणाबाबत दिग्गजांनी मार्गदर्शन करण्याचा अभिषेक यांनी सल्ला दिला आहे. बॅनर्जींच्या कौटुंबिक लढ्याबद्दल भाजपा नेते समिक भट्टाचार्य यांना विचारले असता ते म्हणाले की, हे काही नवीन नसून हा कौटुंबिक मेलोड्रामा आहे. लोकांना त्यात रस नाही. भाजपालाही रस नाही. जेव्हा घराणेशाही संपुष्टात येत असते, तेव्हा असे प्रकार घडत असतात. ममता बॅनर्जी यांचं कुटुंब तोडावं एवढी वाईट वेळ भाजपावर आलेला नाही.