जालना : मराठा समाजास ओबीसीमधून आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीचा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुनरुच्चार केला आणि राज्यात नवीन सरकार स्थापन झाले की सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करण्यात येईल, असे रविवारी सांगितले. आंतरवाली सराटी येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जरांगे म्हणाले, सरकार कुणाचेही येवो, आम्हाला आंदोलन करावे लागेल हे आपण आधीच सांगितले होते.

हेही वाचा >>> समाजात फूट पाडणारी वक्तव्ये केल्याने मतांचे ध्रुवीकरण; शरद पवार यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा निवडणुकीत जरांगे प्रभाव अयशस्वी ठरला, अशी टीका करणारांना मराठ्यांचा प्रभाव कळण्यासाठी संपूर्ण हयात जाईल. आपण मराठ्यांच्या मतांवर विजयी झालो नाही, असे निवडून आलेल्या एखाद्या आमदारास बोलून दाखवण्यास सांगा. आम्ही उमेदवाराच उभे केले नव्हते. तरीही आमचा प्रभाव अयशस्वी झाला असे का म्हणता? मराठा मतांशिवाय कुणीही सत्तेवर येऊ शकत नाही. मराठा प्रभाव अयशस्वी झाल्याचे विश्लेषण काय करता? महिनाभर थांबा, तुम्हाला आमची ताकद कळेल. मराठा समाज सर्व पक्षांत विखुरलेला असला तरी तो आरक्षणाच्या आंदोलनात एकत्र दिसेल. निवडून येणारे आणि पराभूत होणारे दोघांनीही मराठ्यांच्या मदतीला गेले पाहिजे, असे जरांगे म्हणाले.