दिल्ली महापालिका (एमसीडी) निवडणुकीतील एकमेव ट्रान्सजेंडर उमेदवार बॉबी किन्नर विजयी झाली आहे. आम आदमी पार्टीने(आप) त्यांना सुलतानपुरी-ए-प्रभाग ४३ मधून उमेदवारी दिली होती. दिल्ली निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडर उमेदवाराचा विजय झाला आहे.

दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या अगोदर कोणत्याही राजकीय पक्षाने ट्रान्सजेंडरला आपला उमेदवार बनवलं नव्हतं. बॉबीने या अगोदर २०१७ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, मात्र तेव्हा पराभवाचा सामना करावा लागला होता.

कोण आहे बॉबी किन्नर? –

एमसीडी निवडणुकीत विजयी झालेल्या बॉबी किन्नर यांचे सुरुवातीचे आयुष्य अत्यंत संघर्षात गेले. त्यांना लहानपणी बराच त्रास दिला गेला. १४-१५ वर्षाच्या वयात असताना त्यांना ट्रान्सजेंडर समुदायाच्या एका गुरुने आपल्याबरोबर नेले. आज सुलतानपुर माजरा येथील नागरिक बॉबीला प्रेमाने बॉबी डार्लिंग असं म्हणतात.

३८ वर्षी बॉबीने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले होते की, “मी आयुष्यात अपमानाला सामोरी गेले आहे. मात्र मी कधीच स्वप्न पाहणं सोडलं नाही. मला आशा आहे की माझ्या सारख्या ट्रान्सजेंडर लोकांना एक दिवस समाजात सन्मान नक्कीच मिळेल. मला माहीत आहे की ट्रान्सजेंडर लोकांना अद्यापही हीन दृष्टीने पाहीले जाते. खूप काही करावं लागणार आहे, मात्र हे पहिलं पाऊल आहे.”

लग्नांमध्ये नाचत होती बॉबी –

बॉबी अगोदर लग्नांमध्ये नाच होती. नंतर ती सामाजिक कार्यकर्ती बनली आणि आता राजकारणात आपला मार्ग तयार करत आहे. आपला प्रवास आठवत बॉबी सांगते की, “शाळेत मला त्रास दिला जात होता. माझे आई-वडील माझ्यावर प्रेम करत होते. मात्र तेदेखील समाजाच्या दबावाखील आले. जेव्हा मी साधारण १४-१५ वर्षांची होते, तेव्हा माझे गुरू मला त्यांच्याकडे घेऊन गेले. ते आता या जगात नाहीत. त्यांनी मला राहण्यास जागा दिली आणि प्रेम दिले. मला माझ्यासारखी लोकं मिळाली, मला घरासारखं वाटलं.”

सुरुवातील बॉबी लग्नांमध्ये आणि वाढदिवसांच्या पार्टीत नाच होती. २१-२२ वर्षांची झाल्यावर ती एका एनजीओशी जुडली गेली. तिथेच तिने लिहिणं शिकलं. इथून तिची सामाजिक कार्यकर्ता बनण्याची सुरुवात झाली. ती वंचित मुलं आणि ट्रान्सजेंडर्स साठी काम करू लागली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुलतानपुरमधील भागात झाला जन्म –

बॉबीचा जन्म आणि पालन-पोषण सुलतानपुर भागात झाला होता. ती आताही आपल्या आईच्या संपर्कात आहे. ती म्हणते, माझी आईने नेहमीच मला प्रेम केले आणि आताही करते. माझा एक छोटा भाऊ आहे, खासगी नोकरी करतो. माझे वडील छोटा ढाबा चालवत होते. मात्र आता ते राहीले नाहीत. माझ्या आईने छोटी-छोटी कामं करून आम्हाला वाढवलं होतं. मी आताही तिला भेटत असते आणि तिच्यासोबत वेळ घालवत असते.