राजगोपाळ मयेकर

दापोली तालुक्यात ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीची घोषणा झाल्याने शिवसेना उद्धव गट आणि राष्ट्रवादी आघाडीसमोरचे आव्हान वाढले आहे. २१ ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी ५३ उमेदवार रिंगणात असून अनेक ग्रामपंचायतींमध्ये युती विरूद्ध आघाडी अशीच दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा… मीही निवडणूक आखाड्यात म्हणत सुरेश नवले यांचा शड्डू

तालुक्यातील एकूण ३० ग्रामपंचायतींमध्ये १८ डिसेंबरला निवडणूक होत आहे. यामध्ये ९ सरपंच बिनविरोध निवडून आले असून त्यात दमामे, देगाव, टाळसुरे, बोंडीवली, भडवळे, विरसई, शिरसाडी, सारंग आणि सोवेली या गावांचा समावेश आहे. तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या जालगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने येथे सर्वांचीच उत्कंठा वाढली आहे.

हेही वाचा… मराठवाडा साहित्य संमेलनावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाची छाप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तालुक्यातील ३० पैकी १७ ग्रामपंचायतींमधील सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. या बिनविरोध निवडणुकीची नोंद करणाऱ्या गावांमध्ये आगरवायंगणी, कादिवली, करंजाणी, कोळबांद्रे, दमामे, देगाव, टाळसुरे, पाचवली, बोंडीवली, भडवळे, विरसई, शिरसाडी, सडवे, सातेरेतर्फे नातू, सारंग, सोवेली, हातीप यांचा समावेश आहे. उर्वरित १३ ग्रामपंचायतींमधील १८ प्रभागात ७६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये कुडावळे, जालगाव, आपटी, उसगाव, उंबरशेत, उंबर्ले, करजगाव, देहेण, वेळवी, शिर्दे, मुर्डी, कळंबट, वांझळोली या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यापैकी काही गावांमध्ये गाव पॅनेलच्या नावाने उमेदवार उभे राहिले असले तरी तेथील लढतींनाही युती विरूद्ध आघाडी असेच स्वरूप आलेले आहे. या निमित्ताने या दोन्ही राजकीय आघाड्यांची आगामी सर्व निवडणुकांमधील रणनीती स्पष्ट होणार आहे.