संजीव कुळकर्णी

नांदेड : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील टप्पा सोमवारी रात्री देगलूर येथून सुरू झाला. या यात्रेतील भारतयात्रींमध्ये विविध राज्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश असून त्यात महाराष्ट्रातील नऊ जणांचा समावेश आहे.

Ambedkarist activists active in support of Mavia Discuss the danger of changing the constitution
‘मविआ’च्या समर्थनार्थ आंबेडकरवादी कार्यकर्ते सक्रिय; राज्यघटना बदलली जाण्याच्या धोक्याची चर्चा
nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
The plight of workers in coalition politics in Raigarh
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरपट
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”

हेही वाचा… ‘भारत जोडो’ यात्रेत ३० हजारांहून अधिक वैदर्भीय सहभागी होणार

भारत जोडो यात्रेचा साडेतीन हजार कि.मी. अंतराचा कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर असा निश्चित झाल्यानंतर देशभरातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते संपूर्ण यात्रेत सहभागी होण्यासाठी इच्छूक होते; पण सर्वांनाच सामावून घेणे शक्य न झाल्यामुळे प्रत्येक राज्यातून काही ठराविक कार्यकर्त्यांची निवड झाली. त्यात महाराष्ट्रातून नांदेड जिल्ह्यातील प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ.श्रावण रॅपनवाड यांची निवड झाली होती.

हेही वाचा… भारत जोडो यात्रेतील ऊर्जेमुळे महाराष्ट्रातील मरगळलेल्या काँग्रेसमध्ये चैतन्य

अशा भारतयात्रींमध्ये नागपूर येथील महेंद्र वोहरा हे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सचिव तसेच नागपूरच्याच वैष्णवी भारद्वाज व पिंकी सिंग यांचाही समावेश आहे. चंद्रपूर येथील एनएसयूआयचे बिट्टू रोशनलाल हेही दोन महिन्यांचा प्रवास करून नांदेड जिल्ह्यात आले आहेत. नाशिक येथील युवक काँग्रेसच्या अतिषा पैठणकर, पालघर येथील कॅप्टन सत्यम ठाकूर, रायगड जिल्ह्यातील नंदा म्हात्रे, नवी मुंबईतील डॉ.मनोज उपाध्याय हेही भारतयात्री आहेत.

हेही वाचा… प्रकाश आबिटकर : विकास आणि जनतेशी नाळ

नांदेड जिल्ह्यातील श्रावण रॅपनवाड यांची भारतयात्री म्हणून निवड झाल्याची बाब यात्रा सुरू झाल्यानंतर समोर आली होती. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांचे निकटवर्ती म्हणून रॅपनवाड यांचा पक्षसंघटनेत प्रवेश झाला होता. तामिळनाडूहून यात्रा सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांनी यात्रेतील अनुभव समाजमाध्यमांतून प्रसृत केले होते. आपल्या कर्मभूमीत दाखल झाल्यानंतर रॅपनवाड यांनी मंगळवारी अन्य महाराष्ट्रीयन भारतयात्रींसोबतचे छायाचित्र काढून घेतले.