सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : ‘ व्यक्तीपेक्षा संघटना मोठी’ हा विचार मला मान्य असून २०१९ नंतर वंजारी समाजाचे आमदार आणि खासदारांमुळे पक्ष वाढला, असे जाहीरपणे सांगत पंकजा मुंडे यांनी गेल्या काही वर्षांपासून हाती घेतलेली देवेंद्र फडणवीस विरोधाची तलवार म्यान केल्याचे या वर्षीच्या दसरा मेळाव्यातून दिसून आले.

Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
Sadabhau Khot on Devendra Fadnavis
“एकलव्याने एक अंगठा दिला होता, पण मी फडणवीसांसाठी दोन अंगठे द्यायला तयार”; सदाभाऊ खोत यांचे विधान

मोठमोठ्या व्यक्तींना संघर्ष चुकलेला नाही, त्यामुळे तो तुमच्या लेकीच्या वाट्याला आहे. पण मीही त्याच विचारांच्या मुशीतून आणि कुशीतून वाढलेली असल्याने कोणावरही नाराज नाही. समाजातील ज्यांना पदे मिळाली त्यांच्यासाठी आनंद असल्याचेही पंकजा मुंडे यांनी सांगितले. पंकजा मुंडे यांना डावलून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पदी डॉ. भागवत कराड, आमदार रमेश कराड यांना भाजपने सत्ता पदे दिल्यानंतर त्यांच्या विरोधात पंकजा समर्थकांनी घोषणाबाजी केली होती.

हेही वाचा… Dasara Melava 2022 : मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यात पालिका निवडणुकांचे रणशिंग

परळी विधानसभेत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी पक्षनेतृत्वावर आपण नाराज असल्याचे संदेश दिले होते. त्यातून बीड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये ‘ फडणवीस’ विरोधी सूर आळवले जात होते. समाजमाध्यमातून ते व्यक्तही होत. याच काळात शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे, आमदार सुरेश धस, यांना भाजपने बळ दिले. पंकजा मुंडे या स्वत:ला पक्षापेक्षाही मोठ्या समजतात अशी चर्चा भाजप व परिवारातील कार्यकर्ते करत होते. त्या चर्चेला पूर्णविराम देणारे भाषण पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण मी ऐकले, त्यात त्यांनी महिलांना पुढे जाऊ देण्याचा संदेश दिला होता. तो संदर्भ पकडून मीही एक स्त्री आहे, असे वाक्य वापरत मीही त्याच विचारांच्या मुशीत घडले असल्याचा उल्लेख त्यांनी केला. एकाच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील समर्थकांना तसेच भाजपमधील धुरिणांना व्यक्तीपेक्षा संघटना मोठी असते असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

हेही वाचा… Dasara Melava 2022 : हिंदुत्वावरून भाजप लक्ष्य

भाजपमधील ‘ओबीसी’ चा एकछत्री विस्तार आपल्याचा नेतृत्वाखाली व्हावा, असे प्रयत्न पंकजा मुंडे यांनी गेल्या काही वर्षांपासून आवर्जून केले. मात्र, अशा प्रयत्नांना पक्षाच्या वरिष्ठांकडून साथ मिळत नाही असे पंकजा मुंडे यांना कळून चुकले आहे. तत्पूर्वी अगदी छगन भुजबळ यांच्याविषयीही त्यांना सहानुभूती असल्याचे दिसून येत होते. मात्र, आता त्या विस्ताराला मर्यादा असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या काही वर्षांत विविध मेळाव्याला येणाऱ्या मोठ्या पाहुण्यांचा ओघही कमी होता. शिवराजसिंह चौहान हे बीड येथे जाहीर कार्यक्रमास उपस्थित असणारे मोठे नेते होते. फडणवीस यांच्या नेतृत्वाला मानणारे राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासारखे नेते भगवानगडावरील मेळाव्यास गैरहजर होते. तसेच आमदार रमेश कराडही व्यासपीठावर नव्हते. मात्र, सुजय विखे, मेघना बोर्डीकर, शिवाजी कर्डिले, महादेव जानकर यांची मेळाव्यास आवर्जून हजेरी होती. त्यांच्या मतदारसंघातील ओबीसी व वंजारी मतांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा मोठा प्रभाव असल्याने त्यांची उपस्थिती महत्त्वपूर्ण मानली जाते.

हेही वाचा… मोदी सरकारला होसबाळे यांनी सुनावले; आता भागवतांनी सावरले

जलसंधारण मंत्रीपदावरून पंकजा मुंडे यांना हटविल्यापासून पंकजा मुंडे- देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये धुसफूस असल्याचे स्पष्ट झाले होते. पुढे ती तेढ विविध कार्यक्रमांतून दिसून आली. आता मात्र, देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत असा शब्दप्रयोग दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी केला. पण त्या शब्दांना आक्षेप असल्याचे गर्दीच्या ओरडण्यातून स्पष्ट झाले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत पंकजा मुंडे यांनी व्यक्तीपेक्षा संघटना मोठी आहे, हे आपल्याला मान्य असल्याचे दसरा मेळाव्यातून मांडले.