माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ‘प्रणब, माय फादर: अ डॉटर रिमेंबर्स’ या आपल्या पुस्तकात अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. त्यामुळे हे पुस्तक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं आहे. या पुस्तकात थेट काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याबाबतच्या काही घटनांचा उल्लेख केल्याने काँग्रेसच्या अंतर्गत गोटात खळबळ उडाली आहे. राहुल गांधींनी २०१३ मध्ये अध्यादेशाची प्रत फाडून फेकावी, असं वक्तव्य केलेलं. त्यावरही पुस्तकात यात शर्मिष्ठा यांनी भाष्य केलं आहे.

‘प्रणब, माय फादर’ या पुस्तकात शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या, “अध्यादेशाची प्रत फाडणे, वारंवार बेपत्ता होणं आणि दोघांमध्ये भेटीच्या वेळेवरून झालेला गोंधळ अशा घटनांमुळे प्रणब मुखर्जींचा पक्षाचं नेतृत्व करणे आणि देशाचं हित पाहणे या राहुल गांधींच्या क्षमतांवरील विश्वास उडाला होता.”

२०१३ मध्ये काय घडलं होतं?

सर्वोच्च न्यायालयाने दोषी सिद्ध झालेल्या आमदार आणि खासदारांना अपिल करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ न देताच अपात्र घोषित करण्याबाबत आदेश दिले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय बदलण्यासाठी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने अध्यादेश जारी केला होता. त्यावर राहुल गांधी संतापले. त्यांनी त्या अध्यादेशाची प्रत फाडली आणि फेकून दिली. तसेच या प्रकरणातील सरकारची भूमिका राजकीय आणि चुकीची असल्याची टीका केली.

एनडीटीव्हीशी बोलताना शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या, “राहुल गांधींनी विधेयक फाडून फेकल्याबाबतची माहिती मीच प्रणब मुखर्जींना दिली. त्यावर ते दुःखी होते. ते संतापले आणि त्यांचा चेहरा लाल झाला होता. त्यांनी ओरडून राहुल गांधी स्वतःला काय समजतात असं म्हटलं. मात्र, मला नंतर याची जाणीव झाली की, सैद्धांतिक पातळीवर प्रणब मुखर्जी राहुल गांधींशी सहमत होते.”

हेही वाचा : “राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजपाचा छुपा अजेंडा…”, शर्मिष्ठा मुखर्जींच्या पुस्तकावर काँग्रेसची ‘ही’ प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“व्यापक चर्चेशिवाय तो अध्यादेश जारी करायला नको होता. त्यावर एक विधेयक सादर करून मग त्याचा कायदा मंजूर करणे करायचा होता. अध्यादेश जारी करायचा नव्हता. त्यामुळे त्यांना अनौपचारिकपणे सरकारला या अध्यादेशाच्या मुद्द्यावर पुढे न जाण्याचा सल्ला दिला होता. असं असलं तरी, अध्यादेश फाडण्याची काय गरज होती अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळेच ते राहुल गांधींवर नाराज होते.”