नागपूर : २०२४ च्या राज्य विधानसभा निवडणुका आटोपून सहा महिने झाले तरी त्याचे कवित्व अद्याप संपलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या अगदी उलट निर्णय आलेल्या विधानसभा निवडणुकीत मतघोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी करीत आहेत. त्यांनी यासंदर्भात प्रथम भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी (जिल्हा नागपूर)आणि आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील मतदार नोंदणीवर आक्षेप घेऊन मतघोटाळ्याच्या आरोपात नागपूरला केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर होणारी चर्चा आणि भाजपकडून दिले जाणारे प्रतिउत्तर यामुले काँग्रेसचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतो आहे. थेट मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघातील मतनोंदणीवर आक्षेप हा गांधी यांनी घातलेला भाजपच्या वर्मावर घाव असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रात २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक लागले. धक्कादायक यासाठी की लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला उत्तम यश आले हा महायुतीला धक्का होता आणि लोकसभेच्या निकालाचा कल विधानसभेतही कायम राहिल असाच अंदाज असताना निकाल मात्र महायुतीच्या बाजूने लागला हा महाविकास आघाडीच्यादृष्टीने धक्का होता. यातून आघाडी अद्याप सावरलेली नाही. विशेषत: काँग्रेसने महायुतीच्या विजयाचे खोलवर जाऊन विश्लेषण सुरू केले. त्यातूनच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात मतघोटाळा झाल्याचा आरोप केला. यासाठी त्यांनी ‘मॅच फिक्सिंग’ हा शब्द प्रयोग करून एकूण निवडणूक प्रक्रियेवरच संशय उपस्तित केला. तो करताना त्यांनी उदाहरणा दाखल ज्या मतदारसंघाची नावे घेतली ती नागपूर जिल्ह्यातील आहे.
राज्यात व केद्राच्या राजकारणात नागपूरला असलेले अनन्यसादारण महत्व हे यामागचे कारण असू शकते . या शिवाय वरील दोन मतदारसंघ हे अनुक्रमे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. येथील मतघोटाळ्याच्या आरोपांची राष्ट्रीय पातळीवर चर्चा घडवून आणने हा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे. यावर होत असलेली चर्चा आणि भाजपकडून देण्यात येत असलेलेल प्रतिउत्तर बघता राहुल गांधी यांची खेळी यशस्वी होत असल्याचे स्पष्ट होते.
टि्वट, पत्रकार परिषद आणि लेख्
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात झालेली मतदार नोंदणी हा राहुल गांधी यांच्या आरोपाचा प्रमुख गाभा राहिला आहे, याबाबत त्यांनी प्रथम पत्रकार परिषद घेऊन नंतर वर्तमानपत्रात लेख लिहून आणि अलिकडेच ट्विट करून निवडणूक आयोगाचे लक्ष वेधत आहेत. पत्रकार परिषदेत व त्यांच्या लेखात बोगस मतदार नोंदणीचा मुद्दा उपत्थित करताना राहुल गांधी यांनी नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघाचे उदाहरण दिले होते.
हा मतदारसंघ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ् बावनकुळे यांचा आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसला जितकी मते पडली होती, तेवढीच मते विधानसभेत सुद्दा पडली, पण भाजपच्या मतांमध्ये ५६ हजाराने वाढ झाली याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. यामुळे खळबळ उडाली. खुद्द भाजप नेते व महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. मतदानाच्या तीन दिवस आधीपर्यंत मतदान नोंदणी सुरू होती. नोंदवलेल्या नावांपुढे जो निवासी पत्ता दिला तेथे ते राहात नसल्याचे आढळूनआले, असा दावा काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांनी केला.
थेट मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघ लक्ष्य
राहुल गांधी यांनी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात पाच महिन्यात आठ टक्के मतदार वाढले असे ्विट करून भाजपच्या वर्मावरच घाव घालण्याचा प्रयत्न केला. आजवर मतघोटाळ्याचे आरोप करताना राहुल गांधी यांनी भाजपच्या बड्या नेत्यांकडे अंगुलीनिर्देश केला नव्हता. पण यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघाची निवड करून भाजपला या मुद्यावर प्रथमच थेट अंगवर घेतल्याचे दिसून येते.
एकाच मोबाईल क्रमांकावरून शेकडो मतदारांची झालेली नोंदणी व त्यांची निवडणूक कर्मचाऱ्यांनी न केलेली खात्री हे सर्वच संशयास्पद असल्याच्या काँग्रेसच्या आरोपाला अद्याप भाजपने उत्तर दिलेले नाही. पण दुसरीकडे याची चर्चा राष्ट्रीयपातळीवर झाली. त्यामुळे नागपूर केंद्रस्थानी आले.