प्रबोध देशपांडे

वाडेगांव (अकोला) : देशात लोकशाहीची हत्या सुरू आहे. त्या विरोधात उभे राहण्याची हिम्मत राहुल गांधींनी दाखवली. राहुल गांधींची पदयात्रा भारतीय राजकारणावर निश्चित प्रभाव टाकेल, असा विश्वास तेलंगणा येथील महिला उद्योजिका आरिफा खान यांनी व्यक्त केला.

ashok gehlot son vaibhav loksabha election
भाजपाने पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा तापवला, अशोक गहलोतांच्या कार्यकाळातील मुद्द्यामुळे सुपुत्र अडचणीत?
nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
मोहिते-पाटील यांच्या भूमिकेकडे साऱ्यांच्या नजरा

राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेमध्ये आरिफा खान यांनी ५०० कि.मी.चा पायदळ प्रवास केला. केंद्र सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त करून त्या विरोधात आपण राहुल गांधी यांच्या पदयात्रेत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहशत आहे. मंत्रिमंडळात देखील कोणी त्यांच्या विरोधात बोलत नाहीत. देशातील बहुतांश विरोधी पक्षाच्या नेत्यांवर त्यांनी दबाव आणून त्यांना गप्प केले. देशात महागाईमध्ये प्रचंड वाढ झाली. तरुणांना रोजगार मिळत नाही. सर्व स्तरावर अपयशी ठरलेल्या केंद्र शासनाकडून दबावतंत्राचे राजकारण सुरू आहे. या विरोधात केवळ केवळ राहुल गांधी यांचा लढा सुरू आहे. त्यांना साथ देण्यासाठी आपण तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक व आता महाराष्ट्रात यात्रेत सहभागी झाल्याचे खान यांनी सांगितले. माझी आई टीडीएस पक्षाशी जुळली आहे. मात्र, त्या पक्षाच्या नेत्यांनी मवाळ भूमिका घेतल्याने राहुल गांधी यांच्यासोबत २०१९ पासून जुळल्याचे खान म्हणाल्या.

हेही वाचा… केदार साठे : संस्थात्मक कामातून संघटनेला बळ

आजीला शेती प्रश्नांची, तर नातीला नोकरीची चिंता

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे स्वागत करण्यासाठी पातूर ते वाडेगाव दरम्यान बाभूळगाव येथे वृद्ध महिला, तरुणी स्वागत करण्यासाठी दुतर्फा उभ्या होत्या. शेतीचे प्रश्न सुटत नसल्याची व्यथा ७५ वर्षीय विमल तिडके यांनी व्यक्त केली. राहुल गांधी यांना कापसाचा हार घालून शेती प्रश्न त्यांच्याकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची नात वैष्णवी तिडके हिने नोकरीविषयी चिंता व्यक्त केली.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live : सावरकर वादावरुन काँग्रेस-मनसे संघर्षाची चिन्हं; वाचा राज्यभरातील सविस्तर बातम्या

राहुल गांधी पंतप्रधान होण्यासाठी १२ वर्षांपासून विनाचप्पल प्रवास

राहुल गांधी पंतप्रधान होईपर्यंत १२ वर्षांपासून पंडित दिनेश शर्मा विनाचप्पल प्रवास करीत आहे. भारत जोडो यात्रेत देखील ते कन्याकुमारीपासून सहभागी झाले. राहुल गांधी पंतप्रधान होईपर्यंत आपण चप्पल घालणार नसल्याचा संकल्प केल्याचे दिनेश शर्मा यांनी सांगितले.