राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सचिन पायलट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि असदुद्दीन ओवेसी यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदी आणि असदुद्दीन ओवेसी राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी निवडणुकीत आपापल्या पक्षांना जास्तीत जास्त मतं मिळावीत, हा त्यांचा उद्देश आहे. पण निवडणुका संपल्या की हे दोघेही राजस्थानातून आपोआप गायब होतील.

सोमवारी श्रीगंगानगरमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना सचिन पायलट म्हणाले की, दिल्ली-दौसा-लासौट महामार्गाच्या उद्घाटनासाठी दौसाची निवड करण्यात आली. कारण दौसामध्ये काँग्रेस खूप मजबूत आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांना फक्त अशाच ठिकाणांना भेट द्यायची आहे, जिथे काँग्रेस मजबूत आहे.

हेही वाचा- खासगी फोटो लिक झाले आणि महिला IPS-IAS अधिकाऱ्यांमध्ये जुंपली; जाणून घ्या कोण आहेत डी रुपा आणि रोहिणी सिंधुरी?

पीएम मोदी आणि एआयएमआयएमचे प्रमुख ओवेसी यांच्यावर हल्लाबोल करताना सचिन पायलट म्हणाले की, हा फेब्रुवारी महिना खूप खास आहे. पंतप्रधान दौसाला जात आहेत. ओवेसी टोंक येथे जाणार आहेत. हे सगळं होत आहे, कारण राज्यात यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. गेली चार वर्षे हे दोन्ही नेते कुठे होते? निवडणुका जवळ आल्याने हे दोन्ही नेते भाषणे देत आहेत. धर्मावर बोलत आहेत. पण हे लोक निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर आपल्या राज्यात कधीही फिरकत नाहीत.

हेही वाचा- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या बहिणीला तेलंगणात तीन महिन्यांत तिसऱ्यांदा अटक; काय आहे कारण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही इथेच आहोत. आम्ही तुमच्या सुख-दु:खाचे सोबती आहोत. या लोकांनीच शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे केले. हेच लोक धर्माच्या नावावर मते मागून सत्तेपर्यंत पोहोचले आहेत. ते सत्तेत असूनही त्यांना ना महागाई कमी करता येत आहे, ना बेरोजगारी दूर करता येत आहे, अशी टीका सचिन पायलट यांनी केली.