काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी गुरुवारी ‘भारत जोडो यात्रे’बाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला देशातील जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. यामुळे सत्ताधारी भाजपा सरकारची झोप उडाली आहे. पण लोकांच्या या प्रतिसादाचं रुपांतर मतांमध्ये करणं, हे पुढील आव्हान आहे. त्यांचं आपोआप मतात रुपांतर होणार नाही, असं विधान शशी थरूर यांनी केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शशी थरूर नुकतंच ‘आंबेडकर : अ लाइफ’ या आपल्या नवीन पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी कोलकाता येथे होते. यावेळी त्यांनी ‘ऑक्सफर्ड बूक स्टोअर’मध्ये १२ ते १५ जानेवारीदरम्यान आयोजित केलेल्या ‘अपीजय कोलकाता लिटररी फेस्टिव्हल’ (AKLF) च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

हेही वाचा- “BJP-RSS गुरूसमान, त्यांच्यामुळेच मला…”; खोचक टोला लगावत काय म्हणाले राहुल गांधी?

या कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना थरूर म्हणाले, “भारत जोडो यात्रा ही प्रचंड यशस्वी ठरली आहे. ही यात्रा जिथे-जिथे गेली तिथे लोकांची मनं जिंकली. यामुळे राहुल गांधींची जनमानसात असलेली प्रतिमा सुधारण्यासाठी याचा फायदा होईल. लोकांनी त्यांना वैयक्तिकरित्या मनापासून स्वीकारले आहे. पण आता याचं मतांमध्ये भाषांतर करणे, हे पुढील आव्हान आहे. या लोकांचं स्वयंसिद्धपणे मतात रुपांतर होणार नाही. पारंपरिकपणे काँग्रेसशी संबंधित नसलेल्या लोकांनी भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला, ही उत्साह निर्माण करणारी बाब आहे,” असंही थरूर म्हणाले.

हेही वाचा- ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी बसपा राबवणार खास मोहीम, मायावतींनी कार्यकर्त्यांना दिला महत्त्वाचा आदेश!

भारत जोडो यात्रेच्या यशाला कोविडच्या नवीन उपप्रकारामुळे धोका निर्माण होऊ शकतो का? असं ‘इंडियन एक्स्प्रेस’ने विचारलं असता, थरूर म्हणाले, “आम्ही भारत जोडो यात्रेच्या समाप्तीकडे येत आहोत. २६ जानेवारीला या यात्रेचा समारोप होणार आहे. चीनमध्ये प्राणघातक ठरणारी करोना विषाणूचे व्हेरिएंट भारतात जून/जुलैमध्येच आढळली होती. त्यामुळे कोणतीही मोठी आपत्ती उद्भवली नाही. त्यामुळे आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. पण २०२०, २०२१ आणि २०२२ मध्ये आपण करोनाच्या जीवघेण्या संकटाला सामोरं गेलो आहोत. त्यामुळे आपण सतर्क राहणे आवश्यक आहे,” असंही थरूर म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashi tharoor on bharat jodo yatra and congress mp rahul gandhi image rmm
First published on: 31-12-2022 at 17:52 IST