मोहन अटाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालेगाव (जि. वाशीम) : या आधी कधीही अशा प्रकारच्या पदयात्रेत सहभाग घेतला नव्हता. कन्याकुमारीपासून आम्ही राहुल गांधी यांच्या सोबत पायी निघालो. सुरुवातीला पायी चालण्याचा त्रास झाला. मी तर आजारीच पडले. रुग्णवाहिकेतून मला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी वाटले की आता आपल्याला पदयात्रेत सहभाग घेता येणार नाही, पण आमच्या पथकातील डॉक्टरांनी खूप चांगली काळजी घेतली. मी बरी झाले आणि पुन्हा पायी चालू लागले. एक कुठली तरी शक्ती आहे, जी आम्हाला पुढे ढकलत चालली आहे… अशा शब्दात अतिशा पैठणकर ही तरुणी आपल्या भावना व्यक्त करते.

हेही वाचा… भास्कर अंबेकर : राजकारणाला सामाजिक कार्याची जोड

राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून सुरू केलेल्या भारत जोडो पदयात्रेत महाराष्ट्रातील नऊ जणांचा समावेश आहे. त्यात श्रावण रॅपनवाड, रोहन लाल बिट्टू, मनिंदर सिंग वोरा, वैष्णवी भारद्वाज, मंदा म्हात्रे, अतिशा पैठणकर, सत्यम ठाकूर, मनोज कुमार उपाध्याय आणि पिंकी राजकुमार सिंग यांचा समावेश आहे. खासदार राहुल गांधी यांची आणि यात्रेतील सहभागी सर्वांची दिनचर्या ही पहाटे पाच वाजेपासून सुरू होते. साडेपाच वाजता ध्वजवंदन झाल्यानंतर यात्रेला सुरुवात होते सकाळच्या सत्रात चालल्यानंतर दुपारच्या सत्रात विश्रांती असते या वेळी राहुल गांधी हे अनेक लोकांसोबत संवाद साधतात. विश्रांतीनंतर पुन्हा ही यात्रा सुरू होते.

हेही वाचा… शेतकऱ्यांना संपवण्याचे भाजपचे धोरण; राहुल गांधी यांची टीका

अतिशा पैठणकर नाशिक रोड येथील रहिवाशी आहे. या तरुणीची कथा ही वेगळीच आहे. अतिशाची निवड भारत यात्रेकरू म्हणून झाली आणि त्याचवेळी तिला एअर इंडियात नोकरी देखील मिळाली. नोकरी की भारत जोडो यापैकी कशाची निवड करायची? याबाबत ती द्विधा मन:स्थितीत होती. अखेर तिने नोकरीवर पाणी सोडले आणि भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांना ही बाब कळाल्यानंतर त्यांच्या रोषाचा सामनाही तिला करावा लागला. मात्र, एक महिन्यात परत येऊन पुन्हा नोकरी करेल, असा शब्द तिने दिला. यानंतर आई वडिलांनी दिलेल्या होकारानंतर अतिशा हिने कन्याकुमारी गाठले.

हेही वाचा… शेतकरी आत्महत्या वाढीस सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत, काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

अतिशासह महाराष्ट्रातील इतर यात्रेकरूंमध्ये वेगळाच उत्साह आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर येताच हे सर्व जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर नतमस्तक झाले. भारत जोडो यात्रेचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे असतात. त्याच्या डोळ्यातील आश्वासक भाव आम्हाला प्रेरणा देत असतात. ज्येष्ठ लोक आशीर्वाद देतात, त्याने अधिक बळ मिळते. आपल्या राज्यातून आपण मार्गक्रमण करीत आहोत, ही भावनाच वेगळा आनंद देणारी आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये लोकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता, असे अतिशा पैठणकर सांगते.

हेही वाचा… भारत जोडो यात्रा थांबल्यास त्याचे काय परिणाम होतील, याची चिंता करावी – नाना पटोले

आता पुढे थंडीचे दिवस आहेत. कडाक्याच्या थंडीत पहाटे उठावे लागेल. त्याचे आव्हान जरी असले तरी इच्छाशक्ती प्रचंड असल्याने त्यावर देखील मात करू, असा विश्वास अतिशा हिने व्यक्त केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The emotions expressed by young women who participated from kanyakumari in bharat jodo yatra there is a force that pushes me forward print politics news asj
First published on: 17-11-2022 at 13:27 IST