Upendra Kushwaha Resign Nitish Kumar JDU : बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेडचे(जदयू) वरिष्ठ नेते उपेंद्र कुशवाह यांनी पक्ष सोडला आहे. एवढच नाहीतर त्यांनी नवीन पक्ष निर्माण करणार असल्याचीही घोषणा केली आहे. त्यांच्या नव्या पक्षाचे नाव राष्ट्रीय लोक जनता दल असणार आहे. मागील अनेक दिवसांपासून उपेंद्र कुशवाह मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांशी नाराज होते.

उपेंद्र कुशवाह यांनी पत्रकारपरिषदेत नितीश कुमारांवर टीका केली. त्यांनी म्हटले की, आजपासून एका नव्या राजकारणाला सुरुवात होत आहे. काहीजणांना सोडलं तर जदयूमध्ये प्रत्येकजण चिंता व्यक्त करत होता. निवडून आलेल्या सहकाऱ्यांसोबत बैठक झाली आणि निर्णय घेण्यात आला. नितीश कुमारांनी सुरुवातीस चांगले काम केले, मात्र नंतर ज्या मार्गावर चालणे त्यांनी सुरू केले, तो त्यांच्यासाठी आणि बिहारसाठी अयोग्य आहे.

यावेळी उपेंद्र कुशवाह यांनी नव्या पक्षाची घोषणा करताना सांगितले की, आम्ही नवा पक्ष राष्ट्रीय लोक जनता दल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. मला याचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं गेलं आहे. पक्ष कर्पूरी ठाकूर यांची परंपरा पुढे चालवेल. राजद सोबत झालेला करार संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने काम केले जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाचा नितीश कुमारांवर निशाणा –

रविशंकर प्रसाद यांनी नितीश कुमारांना तुम्ही माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांच्यासारखे बनू इच्छित आहात का? असा प्रश्नही विचारला आहे. तसेच, नितीश कुमारांच्या पक्षात गोंधळ उडालेला आहे. राज्यावर संकट निर्माण झाले आहे, त्यांचा सहकारी पक्षही त्यांना मदत करत नाही. नितीश कुमार तुम्ही तुमचे हाल माजी पंतप्रधान देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांच्यासारखे करू इच्छित आहात का?