प्रसाद रावकर

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेली पोटनिवडणूक अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली असून भाजपने माघार घेतल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहेत. भाजपाचे उमेदवार मोरजी पटेल यांनी माघार घेतली तरी ऋतुजा लटके यांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करीत आपला प्रचार सुरू ठेवला आहे. छोटेखानी चौकसभा, पदयात्रा, घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधण्यात येत आहे.

Raju Shetti, Lok Sabha Election Campaign, krantisinh nana patil, machhindra village, hatkangale lok sabha seat, lok sabha 2024, election Campaign, Raju Shetty in machhindra village, Raju Shetty's Election Campaign, marathi news,
नैतिकतेच्या जोरावर चौथ्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकणार; प्रचार शुभारंभ सभेत राजू शेट्टी यांचा विश्वास
Vinod Tawde reply that opponents are spreading propaganda about
भाजपबाबत विरोधकांचा अपप्रचार; काँग्रेस राजवटीत ८० घटनादुरुस्त्या; विनोद तावडे यांचे प्रत्युत्तर
Lok Sabha Elections 2024 Aggressive campaigning of candidates on social media
लोकसभा निवडणूक : उमेदवारांचा समाज माध्यमावर आक्रमक प्रचार
Will contest and win the Lok Sabha elections from people contribution says Raju Shetty
लोकवर्गणीतून लोकसभा निवडणूक लढवून जिंकणार; राजू शेट्टी यांचा विश्वास

हेही वाचा >>> अतिवृष्टीग्रस्तांसाठी शरद पवारांचा पुढाकार; ऐन दिवाळीत दौऱ्यावर

आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात येत्या ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत असून शिवसेनेने लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेने मंजूर केला आणि त्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला होता. भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी देऊन पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मात्र नंतर भाजपने पटेल यांची उमेदवारी मागे घेतली.

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यात दिवाळीलाही दहीहंडीसारखी राजकीय शक्ती प्रदर्शनाची स्पर्धा; ‘दिवाळी पहाट’चे रूपांतर राजकीय आखाड्यात

या पोटनिवडणुकीसाठी एकूण १४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. मात्र पटेल यांच्यासह सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आजघडीला लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यात आपकी अपनी पार्टीचे (पीपल्स)चे बाला वॅकटेश विनायक नाडार, राईट टू रिकॉल पार्टीचे मनोज नायक, अपक्ष नीना खेडेकर, फारहान सिराज सैयद, मिलिंद कांबळे, राजेश त्रिपाठी यांचा समावेश आहे. भाजपने माघार घेतल्यानंतर रिंगणात तुल्यबळ उमेदवार नसला तरीही ऋतुजा लटके यांनी पोटनिवडणुकीसाठी प्रचार सुरू ठेवला आहे. मतदारसंघातील इमारती, चाळी, झोपडपट्ट्यांमधील मतदारांशी संवाद साधण्यात त्या व्यस्त आहेत. तसेच छोटेखानी चौक सभा, पदयात्रांवर भर देण्यात आला आहे. घरोघरी भेट देऊन मतदारांशी संपर्क साधण्यात येत आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. प्रचारासोबतच मतदानाच्या हक्कबाबत जनजागृतीही त्या करीत आहेत. प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावायलाच हवा, असे आग्रहाने त्या मतदारांना सांगत आहेत.