चंद्रशेखर बोबडे

नागपूर : भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना पराभूत करून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेले अमोल काळे यांचे नाव सध्या क्रीडा विश्वातच नव्हे तर राजकीय वर्तुळातही चांगलेच चर्चेत आले आहे. कोण आहेत हे अमोल काळे, क्रिकेटशी त्यांचा असलेला संबंध, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची मैत्री हे सर्व जाणून घेण्याबाबत सर्वांना कमालीची उत्सुकता आहे.

BJP needs support from MNS A look at Raj Thackeray stance on participation in the Grand Alliance
भाजपला मनसेची साथ हवी ; महायुतीतील सहभागाबद्दल राज यांच्या भूमिकेकडे लक्ष
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…
mns trade union vice president raj parte attacked attacked with Rods and knife
मनसे कामगार सेनेच्या अंतर्गत वादातून उपाध्यक्षावर चाकू व रॉडने हल्ला; दोन पदाधिकाऱ्यांसह १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा
Sharad Pawar Wardha tour
वर्धा : शरद पवार यांच्याकडे काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी, पवार म्हणाले…

हेही वाचा… दिल्लीत बंदी असताना आप मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले; भाजपा म्हणाली, “केजरीवाल हिंदू विरोधी…”

मुळात अमोल काळे हे नागपूरकर आहेत. ते येथील अभ्यंकरनगरात राहतात. फडणवीस यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख. वडील किशोर काळे यांचे जे. के. इलेक्ट्रिकल्स हे दुकान होते. व्यवसायाची घडी विस्कटलेली होती. कुटुंब संघ परिवाराशी संबंधित होते. पण ते कधी सक्रिय राजकारणात नव्हते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यावर ते सक्रिय झाले. वाजपेयींच्या कार्यकाळात राष्ट्रीय विधि आयोगाच्या उपाध्यक्षपदी दिवंगत आप्पासाहेब घटाटे यांची नियुक्ती झाली होती. घटाटे हे अमोल यांच्या वडिलांचे स्नेही. वाजपेयी सरकारच्या काळातच किशोर काळे यांना वीजक्षेत्रातील अनेक कंत्राटे मिळाली. यातून तोट्यातील व्यवसाय सावरला गेला. पुढे अमोल स्वत: विद्युत अभियंता असल्याने त्यांनी याच व्यवसायात पाऊल ठेवले.

हेही वाचा… जयललिता मृत्यू चौकशी अहवाल : कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार, शशिकला यांनी सर्व आरोप फेटाळले

हेही वाचा… तुम्हाला माहितीये का मोती साबण अन् दिवाळीचं नातं कसं जुळलं? हा साबण दिवाळीत वापरण्यास सुरुवात कधी झाली?

फडणवीस यांच्याशी त्यांची मैत्री जुनीच. पण राजकारणात ते कधीच सक्रिय नव्हते. २०१४ मध्ये फडणवीस यांच्या नेतृत्वात युतीचे सरकार आल्यावर अमोल यांच्या ‘जे. के. सोल्युशन्स’ या कंपनीला शहरातील पथदिव्यांना एलईडी लाईट्समध्ये परावर्तित करण्याचे कंत्राट मिळाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. रिअल इस्टेट, आरोग्य, लॉजिस्टिक्स, मीडिया व्यवस्थापन, संरक्षण, ऊर्जा क्षेत्रात पाऊल ठेवले. फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी ते कुठल्याही पदावर नव्हते. पडद्यामागे राहूनच काम करण्याला त्यांनी पसंती दिली. मात्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांच्या अभ्यंकरनगरमधील निवासस्थानी (ते नागपुरातील दुसरे ‘व्हाईट हाऊस’ म्हणून ओळखले जाते) अधिकारी आणि नेत्यांचा कायम राबता असायचा. मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरल्यावर सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्यासारखा तगडा विरोधक पुढे असल्याने सहाजिकच निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता होती. मात्र खुद्द फडणवीस त्यांच्यासाठी प्रचार मैदानात उतरले. त्यामुळे अमोल आणि फडणवीस यांची मैत्री जनतेपुढे आली. अमोल यांचा क्रिकेटचा संबंध शालेय, महाविद्यालयीन जीवना पुरता मर्यदित. पण क्रिकेट त्यांच्यासाठी नवीन नाही. ते यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष होते. आता थेट या संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली.