नागपूर : इतर मागासवर्गीयांमधून मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आग्रही असणारे मराठा आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांचा राज्यातील महायुती सरकारबरोबर संघर्ष सुरू असला तरी त्यांचा सर्वाधिक राग भारतीय जनता पक्षावर आहे. युतीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांबाबत ते सौम्य भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सरकारवर टीका करताना ते फक्त भाजप व पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांची टीका सौम्य स्वरूपाची असते, असे अनेक वेळा दिसून आले आहे. हे दोन्ही नेते सरकारचेच घटक असतानाही जरांगेंची भूमिका वेगळी का, असा सवाल केला जात आहे.

हेही वाचा : RSS Annual Meeting: संघाची गरज नाही म्हणणारे जेपी नड्डा RSS च्या बैठकीला उपस्थित राहणार; ‘हे’ आहेत महत्त्वाचे मुद्दे

केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार आहे. त्यांनी ठरवले तर मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. राज्यातील महायुती सरकारमध्ये भाजपच मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे जरांगे पाटील भाजपला लक्ष्य करतात. त्यात गैर काहीही नाही.

प्रकाश खंडागळे, सकल मराठा समाज

देवेंद्र फडणवीस किंवा छगन भुजबळ म्हणजे सरकार नव्हे. जरांगे यांनी सरकारवर टीका करायला हवी. उठसूठ आंदोलन करून समाज वेठीस धरू नये.

बबनराव तायवाडे, अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ

हेही वाचा : जे.पी. नड्डा यांच्याकडून कंगना यांची कानउघाडणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात आहे. त्यांच्या इशाऱ्यावरच ते भाजपला लक्ष्य करीत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडीला न्यायालयात हा निर्णय टिकवता आला नाही.

सुधाकर कोहळे, अध्यक्ष, भाजप, नागपूर जिल्हा