News Flash

Pro Kabaddi Season 6 : पोस्टरबॉय राहुल चौधरी चमकला, अनोख्या विक्रमाची नोंद

बंगळुरु बुल्सविरुद्ध सामन्यात केला विक्रम

Pro Kabaddi Season 6 : पोस्टरबॉय राहुल चौधरी चमकला, अनोख्या विक्रमाची नोंद
छायाचित्र संग्रहीत आहे

बंगळुरु बुल्सविरुद्ध सामन्यात तेलगू टायटन्सला अटीतटीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र संघाचा महत्वाचा खेळाडू राहुल चौधरीने धडाकेबाज कामगिरी करत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. प्रो-कबड्डीच्या इतिहासात 800 गुणांची कमाई करणारा राहुल चौधरी पहिला खेळाडू ठरला आहे.

बंगळुरुविरुद्ध सामन्यात हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी राहुलला अवघ्या 3 गुणांची गरज होती. आतापर्यंत प्रो-कबड्डीच्या इतिहासात 90 सामन्यांमध्ये राहुल चौधरीच्या नावावर 797 गुण जमा होते. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात आठव्या मिनीटालाच राहुलने ही कामगिरी करुन दाखवली.

प्रो-कबड्डीत सर्वाधीक गुण मिळवणारे कबड्डीपटू –

राहुल चौधरी – तेलगू टायटन्स – 803 गुण

प्रदीप नरवाल – पाटणा पायरेट्स – 778 गुण

अजय ठाकूर – तामिळ थलायवाज – 688 गुण

दिपक निवास हुडा – जयपूर पिंक पँथर्स – 680 गुण

काशिलींग अडके – बंगळुरु बुल्स – 602 गुण

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : तेलगू टायटन्सची झुंज मोडून काढत बंगळुरु बुल्सची बाजी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 3:01 pm

Web Title: pro kabaddi 2018 season 6 rahul choudhari becomes first player to cross 800 point mark
टॅग : Pro Kabaddi 6
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : तेलगू टायटन्सची झुंज मोडून काढत बंगळुरु बुल्सची बाजी
2 Pro Kabaddi Season 6 : पिछाडी भरुन काढत पुणेरी पलटणची हरयाणा स्टिलर्सवर मात
3 Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाच्या सिद्धार्थ देसाईला बंगळुरुच्या पवन शेरावतची कडवी टक्कर
Just Now!
X