News Flash

पुण्यात करोनाचे १६३ तर पिंपरीत ९५ नवे रुग्ण

पुण्यात सहा तर पिंपरीत आठ जणांचा करोनामुळे मृत्यू

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १६३ रुग्ण आढळल्याने १ लाख ६५ हजार ४२ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ४ हजार ३९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ११० रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ५६ हजार ४७१ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९५ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६१ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८९ हजार ७८८ वर पोहचली असून पैकी ८६ हजार ६७८ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६२१ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 9:34 pm

Web Title: 163 new corona cases in pune and 95 in pimpri scj 81 kjp 91 svk 88
Next Stories
1 एकविरा मंदिरात भाविकांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंग फज्जा
2 पिंपरीत सुलभ शौचालयाच्या हौदात सापडली मानवी कवटी आणि हाडं, पोलीसही चक्रावले
3 पुण्यात दिवसभरात १३७, पिंपरी-चिंचवडमध्ये ९३ करोनाबाधितांची नोंद
Just Now!
X