07 August 2020

News Flash

पुण्यात दिवसभरात आढळले १,८३८ करोनाबाधित रुग्ण; १८ रुग्णांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरात आज नवे ६८९ करोनाबाधित रुग्ण आढळले

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १,८३८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या ३५ हजार ८७८ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात १८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आज अखेर ९३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनावर उपचार घेणार्‍या ७७४ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर २१ हजार ८८१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

तर, पिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने ६८९ करोनाबाधित रुग्ण आढळले असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ५८० जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ६ हजार ४८० जण करोनामुक्त झाले आहेत. तर २२६ जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या १० हजार ४४६वर पोहचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 10:29 pm

Web Title: 1838 corona infected patients found in pune during a day 18 patients died aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 पिंपरी-चिंचवड : लॉकडाउनच्या नियमांचे ३,५०० नागरिकांकडून उल्लंघन; ८८ वाहनं जप्त
2 Viral Video : करोनावर मात करुन आलेल्या बहिणीचं दणक्यात स्वागत
3 पिंपरी-चिंचवड : उद्या जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत राहणार सुरू
Just Now!
X