पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात यावा यासाठी जिल्ह्याचे  पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांचे लॉकडाउन लागू केले. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून करोनाग्रस्तांची संख्या वाढतेच आहे. पिंपरीत आज दिवसभरात ७१५ करोना रुग्ण आढळले आहेत. यातले काही रुग्ण ग्रामीण भागातले आहेत. मात्र ते महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेतल. शहरातल्या एकूण करोनाबाधितांची संख्या ९ हजार ७९० एवढी झाली आहे.

सोमवारी मध्यरात्रीपासून शहरात दहा दिवसांचे कडक लॉकडाउन लागू करण्यात आले. त्यानुसार शहरात प्रत्येक चौकात, परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावत संचारबंदी लागू करण्यात आली. तीन दिवसानंतर शहरातील बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येईल असं वाटत होतं. मात्र गेल्या तीन ते चार दिवसात रुग्णसंख्येचा आलेख चढता पाहण्यास मिळतो आहे.

आज दिवसभरात शहरी आणि ग्रामीण भागातील एकूण 715 जण करोना बाधित आढळले आहेत. तर 6 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आज 341 जण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या दहा हजारांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असून शहरातील ऐकून बाधित रुग्णांची संख्या 9 हजार 790 वर पोहचली आहे. आत्तापर्यंत 5 हजार 900 जण करोनामुक्त झाले आहे. तसेच शहर आणि ग्रामीण भागातील 211 जणांना मृत्यू झाला आहे. सध्या महानगर पालिकेच्या सक्रिय रुग्णाची संख्या 3 हजार 109 आहे. सध्या लागू असलेला लॉकडाऊन कितपत करोना रोखण्यास मदतनीस ठरतो हे पाहणे महत्वाचे आहे.

“लॉकडाऊन चा हेतूच हा आहे, की पॉजिटिव्ह रुग्णांचा शोध घेऊन आयसोलेट करायचं. लॉकडाऊन केलं नसत तर हे बाधित रुग्ण अनेक ठिकाणी फिरले असते. करोना संक्रमणाची चैन वाढत गेली असती. पुढील काही दिवस संख्या वाढणारच आहे. टेस्टिंग ची संख्या देखील वाढवली आहे.”

श्रावण हर्डीकर- महानगर पालिका आयुक्त