News Flash

VIDEO: धावत्या रिक्षातून कुत्र्याला लाथ मारायला केला आणि घडली जन्माची अद्दल; घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्यातील घटना

रस्त्यावर उभ्या कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षाचालकाला जन्माची अद्धल घडली आहे. रस्ता ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या कुत्र्याला लाथ मारण्याच्या नादात रिक्षाचालक तोंडावर आपटला. ही घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज चांगलंच व्हायरल होत आहे.

पिंपरी शहरतील शगुण चौकात शनिवारी दुपारी ही घटना घडली. रिक्षा दुभाजक ओलांडून पलीकडे गेल्याने पोलिसांनाही हा अपघात नेमका कसा झाला याची उत्सुकता होती. सीसीटीव्ही तपासण्यात आलं असता रिक्षातून भरधाव वेगाने येत असताना चालकाने कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं.

अपघात इतका भीषण होता की, चालक रिक्षातून फेकला गेला आणि तोंडावर आपटला. तर दुसरीकडे रिक्षा दुभाजक ओलांडून गेली. यावेळी तिथे उपस्थित काही नागरिकांनी धाव घेत रिक्षा थांबवली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने यावेळी कोणतंही वाहन जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघातानंतर उपस्थित नागरिकांनी समोरुन येणाऱ्या एका कारला वेळीच रोखलं. मात्र या घटनेमुळे चालकाला जन्माची अद्धल घडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 6:26 pm

Web Title: a rickshaw driver met with accident while trying to kick dog on road in pune sgy 87
Next Stories
1 पुणे: ‘मिस यू भाऊ’ म्हणत सराईत गुंडाच्या अंत्यविधीला १२५ बाईक्सची रॅली
2 हातावर पोट असणाऱ्यांची परवड! धान्य किट वाटपाच्या ठिकाणी नागरिकांच्या रांगा
3 धक्कादायक! भररस्त्यात कोयत्याने वार करून तरुणाची हत्या; पुणेकर पाहत राहिले….
Just Now!
X