सामना हे महाराष्ट्राला दिशा देणारं वैचारिक मुखपत्र आहे. त्यावर मी बोलणार नाही असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले. शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. शिक्षणमंत्री वेगळं बोलतायत, राज्यमंत्री वेगळं बोलतायत असे दरेकर यांनी सांगितले.

100 युनिटपर्यंत मोफत वीज दिली नाहीच, करोना काळात अवाजवी बिल कमी केली नाही. उलट वीज बिल भरावचं लागेल, असं सर्क्युलर सरकारने काढले. हे सरकारला संकट काळात शोभा देणारं नाही, असं दरेकर यांनी सांगितले.
परिवहन मंत्रालय शिवसेनेकडे म्हणून पॅकेज आणि काँग्रेसकडे उर्जाखाते आहे, म्हणून पॅकेज दिले नाही.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
eknath shinde devendra fadnavis
सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय? शिंदे गटाचा संतप्त सवाल; नेमकं प्रकरण काय?
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
Supriya Sule Sunetra Pawar
“बारामतीत माझ्याविरोधात…”, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बोलल्या

काँग्रेसची प्रतिमा कमी करण्यासाठी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. नितीन राऊत केवळ काँग्रेसचे आहेत. म्हणून त्यांना तोंडावर आपटवण्याचे काम त्यांच्या महाविकास खात्यातील दोन पक्षांनी केलं का? काँग्रेसने अशी फरपट करून घेऊ नये असे दरेकर म्हणाले.

कंगनाचं समर्थन करण्याच्या मुद्यावर प्रविण दरेकर म्हणाले…
मुंबईच्या विरोधात कोणी बोललं तर त्याला आमचा पाठिंबा नाही. कंगनाच्या चुकीच्या गोष्टींच आम्ही अजिबात समर्थन करणार नाही असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केलं. ते पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

कंगनाचं कार्यालय तोडण्याचं काय कारण होतं? तुमच्या विरोधात बोललं की बांधकाम तोडणार त्या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे असे दरेकर म्हणाले. उद्या पत्रकारांने एखादी भूमिका माडंली ती तुम्हाला पटली नाही म्हणून त्याला जेलमध्ये टाकणार का? असा सवाल दरेकर यांनी केला.