26 September 2020

News Flash

पुण्यात पावसाची शक्यता; वादळी वाऱ्यांसह ढगांचा गडगडाट

पुणे वेधशाळेनं कालच याबाबत इशारा दिला होता.

(संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरात पावसाची शक्यता निर्माण झाली असून वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट ऐकू येत आहे. पुणे वेधशाळेनं कालच याबाबत इशारा दिला होता. सकाळपासूनच शहरातील उकाड्यातही वाढ झाली होती, त्यानंतर संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास शहरात अचानक अंधारुन आलं आणि ढगांचा गडगडाटही सुरु झाला.

वेधशाळेच्या माहितीनुसार, आजपासून पुढील चार-पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. कोकणातून पावसाला सुरुवात होऊन पुढील पाच-सहा दिवस पाऊस पडू शकतो. मुंबईतही २७-२८ तारखेपासून हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्याबाबत सांगायचं झाल्यास उद्या म्हणजेच २५ तारखेला एखाद-दुसऱ्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात चार पाच दिवस हलका पाऊस होईल, असे भाकित पुणे वेधशाळेनेकडून वर्तवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 6:10 pm

Web Title: chance of rain with thunderstorms in pune aau 85
Next Stories
1 पुणे शहरासह जिल्ह्यात पेट्रोल विक्री बंद; अत्यावश्यक सेवांना वगळले
2 पुणे: करोनाची टेस्टिंग करणाऱ्या एका स्वदेशी किटची किंमत ८० हजार
3 पुण्यात अंगणवाडी सेविकेच्या पतीला करोनाची लागण; हॉटेल मॅनेजर म्हणून आहे कामाला
Just Now!
X