News Flash

किरकोळ कारणावरुन पहिलीच्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाकडून बेदम मारहाण

शनिवारी सकाळच्या सत्रात पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिका शिकवत होत्या. परंतु त्या वर्गाबाहेर जाताच विद्यार्थ्यांनी मोठमोठ्याने बाकडे वाजवायला सुरुवात केली.

कडलग यांनी केलेली मारहाण इतकी अमानुष होती की मुलाच्या पाठीवर त्याचे वळ उमटले.

पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे मुख्याध्यापकाने पहिलीच्या विद्यार्थ्याला क्षुल्लक कारणावरुन मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी मुलाच्या आईने खेड पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून लक्ष्मण कडलग असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे. राजगुरूनगर येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक येथे ही घटना घडली.

शनिवारी सकाळच्या सत्रात पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिका शिकवत होत्या. परंतु त्या वर्गाबाहेर जाताच विद्यार्थ्यांनी मोठमोठ्याने बाकडे वाजवायला सुरुवात केली. हा गोंधळ पाहून शेजारील वर्गात शिकवत असलेले मुख्याध्यापक लक्ष्मण कडलग त्या वर्गात गेले. त्यांनी गोंधळ पाहून वर्गातील एका मुलाला हातानेच मारायला सुरुवात केली. कडलग यांनी केलेली मारहाण इतकी अमानुष होती की मुलाच्या पाठीवर त्याचे वळ उमटले. मारहाणीमुळे घाबरलेल्या मुलाने पँटमध्ये लघूशंका केली. शाळा सुटल्यानंतर मुलगा घरी गेला आणि त्याने घरी आईला याबाबत माहिती दिली. मुलाच्या आईने शिक्षका विरोधात खेड पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 2:43 pm

Web Title: class one student beaten by headmaster in pune district rajgurunagar
Next Stories
1 राज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता
2 काँग्रेसमधील गटबाजीला उधाण
3 पुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान
Just Now!
X