प्रकल्पांचा आढावा बैठकीच्या निमित्ताने निवडणुकीची तयारी
पुणे : महापालिके त एकहाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाला चार वर्षात प्रकल्प पूर्ण करण्यात अपयश आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून के ला जात असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधीपक्षनेता, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिके च्या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात के ली आहे. त्यादृष्टीने गेल्या चार वर्षातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस गुरुवारी (११ जानेवारी) महापालिके त येणार आहेत. त्यांच्या भेटीमुळे भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू के ल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. पक्षाचे तब्बल ९८ नगरसेवक आहेत. महापालिके ची आगामी निवडणूक पुढील वर्षी फे ब्रुवारी महिन्यात होणे अपेक्षित आहे. के ंद्रात भाजपची सत्ता, महापालिके त स्पष्ट बहुमत आणि वर्षभरापूर्वीपर्यंत राज्यात भाजपचे सरकार असतानाही पक्षाला शहरात योजना, प्रकल्पांना गती देता आली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडून के ला जात आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून महापौरांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महापालिके त बैठकांचा धडाका सुरू के ला आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराकडे लक्ष के ंद्रित के ले आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतानाच नगरसेवकांशीही फडणवीस संवाद साधणार आहेत.
पक्षाच्या नगरसेवक, पदाधिकारी, आमदारांचा दोन दिवसीय निवासी अभ्यास वर्ग गेल्या आठवड्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये झाला. या अभ्यास वर्गातही देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन के ले होते. निवडणूक पूर्व तयारीच्या दृष्टीने त्यांनी काही सूचना के ल्या होत्या. तत्पूर्वी महापालिके च्या प्रस्तावित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीला गती देण्याबरोबरच रखडलेल्या नदी सुधार योजनेची कामे मार्गी लावण्यासाठी फडणवीस यांनी पाठपुरावा के ला होता. फडणवीस यांच्या मध्यस्तीनेच महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेता गणेश बीडकर यांची त्यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्याबरोबर बैठक घेतली होती. पुणे मेट्रो, पुणे-बेंगलुरू महामार्गाच्या कामाबाबतही त्यांनी के ंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा के ला आहे. आता फडणवीस थेट महापालिके तच येऊन आढावा बैठक घेणार असल्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पुण्याकडे लक्ष के ंद्रित के ल्याचे स्पष्ट झाले असून पक्षाची निवडणूक पूर्वतयारीही सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
फडणविसांच्या भूमिके कडे लक्ष
आगामी महापालिका निवडणूक द्वीसदस्यीय प्रभाग पद्धतीने होईल, अशी चर्चा आहे. चार वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांमध्ये नाराजी असून ते भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या महापालिके त उपमहापौर पदावरून मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नगरसेवकांध्येही नाराजी आहे. त्यामुळे फडणवीस याबाबात काय भूमिका घेणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शहरासाठी अनेक प्रकल्प आणले. या प्रकल्पांच्या गतीचा आढावा घेतला जाईल. मेट्रो, स्मार्ट सिटी, पीएमपीचाही आढावा घेतला जाणार आहे. शहराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे. – मुरलीधर मोहोळ, महापौर,