News Flash

‘स.प.’ प्रवेशांचा गोंधळ संपेना !

आम्ही विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेच नाहीत. मात्र, संघटनांच्या दबावामुळे शि. प्र. मंडळीच्या नियामक मंडळाची बैठक घेऊन अतिरिक्त प्रवेशासंबंधी प्रस्ताव पाठवण्याबाबत निर्णय घेऊ, अशी भूमिका संस्थेने

| October 11, 2013 03:00 am

स.प. महाविद्यालयातील नियमबाह्य़ प्रवेशांबाबत अजूनही काही ठोस निर्णय झालेला नाही. आम्ही विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेच नाहीत. मात्र, संघटनांच्या दबावामुळे या प्रकरणी शि. प्र. मंडळीच्या नियामक मंडळाची बैठक घेऊन अतिरिक्त प्रवेशासंबंधी प्रस्ताव पाठवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका संस्थेने घेतली आहे. याबाबत संस्थेच्या नियामक मंडळाची शुक्रवारी बैठक होणार आहे.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत झालेल्या गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर गुरूवारी शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांच्याबरोबर बैठक होणार होती. मात्र, या बैठकीला शिंदे हजर राहू शकल्या नाहीत. त्यामुळे संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये घोषणाबाजी केली. अखेरीस बंडगार्डन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश निकम यांच्या मध्यस्थीने सहायक शिक्षण उपसंचालक बाळासाहेब ओव्हाळ, शि. प्र. मंडळीचे सचिव अनंत माटे, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आणि नगरसेवक यांच्यामध्ये बैठक झाली. या वेळी, आम्ही या विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेलेच नाहीत. हे प्रवेश नियमबाह्य़च आहेत, अशी भूमिका शि. प्र. मंडळी संस्थेने घेतली आहे. महाविद्यालयाकडून अतिरिक्त प्रवेश क्षमता मिळावी असा प्रस्ताव आल्यास, त्याबाबत नियमानुसार निर्णय घेण्यात येईल, असे या वेळी ओव्हाळ यांनी सांगितले.
या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना माटे यांनी सांगितले,‘‘विद्यार्थ्यांना प्राचार्यानी परस्पर प्रवेश दिले. संस्थेला याबाबत काहीही कल्पना नाही. विद्यार्थी दाखवत असलेले शुल्काचे चलन हे खोटे आहे. मात्र, संघटनांच्या दबावामुळे याबाबत संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक घेण्यात येईल. या बैठकीमध्ये प्रवेश क्षमता वाढवून मिळण्याबाबत जो निर्णय होईल, त्याप्रमाणे शिक्षण विभागाला प्रस्ताव देण्यात येईल.’’
या वेळी ओव्हाळ यांनी सांगितले,‘‘ज्या विद्यार्थ्यांनी स.प. महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळावा अशी मागणी केली आहे, त्या विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून प्रवेश मिळाला होता. याबाबतची माहिती मंत्रालयाकडे पाठवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अतिरिक्त प्रवेश क्षमतेसाठी ३० सप्टेंबपर्यंत प्रस्ताव मागवण्यात आले होते. मात्र, त्या वेळी स.प. महाविद्यालयाने प्रस्ताव दिला नाही. आता महाविद्यालयाने प्रस्ताव दिल्यास त्यावर शासन निर्णय घेईल. त्यानंतर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. या पाश्र्वभूमीवर पुढील वर्षांपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.’’

बारा महाविद्यालयांना अतिरिक्त प्रवेश क्षमता
शहरातील बारा महाविद्यालयांनी दिलेल्या प्रस्तावानुसार त्यांना अतिरिक्त प्रवेश क्षमता मंजूर करण्यात आली आहे. मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड, सिंहगड महाविद्यालय, नवरोसजी वाडिया महाविद्यालय, नेस वाडिया महाविद्यालय, गरवारे वाणिज्य महाविद्यालय, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, विमलाबाई गरवारे प्रशाला, एच. व्ही. देसाई महाविद्यालय, आर. सी. एम. गुजराथी महाविद्यालय, शिवाजी मराठा महाविद्यालय आणि मराठवाडा मित्रमंडळाच्या डेक्कन आणि केळेवाडी येथील महाविद्यालयांमध्ये दहा टक्के अतिरिक्त प्रवेश क्षमता मंजूर करण्यात आली आहे.

‘त्या’ विद्यार्थ्यांचे तपशील संकेतस्थळावर
जे विद्यार्थी स.प. महाविद्यालयातील प्रवेशासाठी हटून बसले आहेत, त्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणते महाविद्यालय मिळाले होते, त्यांनी कोठे प्रवेश घेतले, ते कधी रद्द केले याबाबतचे तपशील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ६६६.८िीिस्र्४ल्ली.ूे या संकेतस्थळावर हे तपशील पाहता येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2013 3:00 am

Web Title: dispute in s p college continued
Next Stories
1 दिवसाला सरासरी चार जणांना डेंग्यू –
2 ‘सांबार’च्या दरवळात रंगल्या ‘रूपाली’, ‘वैशाली’च्या आठवणी!
3 ‘श्रीमंत’ महापालिकेची वाटचाल ‘खडतर’
Just Now!
X