पुणे प्रतिनिधी : पुणे शहरातील जुनी वडारवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग सिलेंडरचा स्फोट झाल्याने लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर भागातील जुनी वडारवाडी हा परिसर दाट लोक वस्तीचा भाग आहे. या ठिकाणी आज मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत २० हून अधिक घरे जळाली असून या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या १५ गाड्या दाखल असल्याचे सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Mar 2020 रोजी प्रकाशित
पुण्यातील जुनी वडारवाडी येथे भीषण आग, घटनास्थळी १५ अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल
घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या १५ गाड्या दाखल असल्याचे सांगण्यात आले.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 19-03-2020 at 00:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire at old wadarwadi in pune due to cylinder blast zws