News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये लाकडाच्या गोदामाला भीषण आग; शेजारील आठ दुकाने आगीत भस्मसात

लाकडाच्या गोदामाला दुपारी तीन वाजता भीषण आग लागली.

पिंपरी-चिंचवडमधील चिखलीत लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दुपारी तीन वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे.या आगीमध्ये आजूबाजूचे आठ दुकाने देखील जळून खाक झाली आहेत. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीत जीवितहानी झालेली नाही किंवा कोणीही जखमी नाही.

मिळालेल्या माहितीनुसार,देहू चिखली रोडवर लाकडाच्या गोदामाला दुपारी तीन वाजता भीषण आग लागली. त्यानुसार अग्निशमन दलाला वर्दी देण्यात आली. घटनास्थळी धाव घेत आगीचे आठ बंब आणि खासगी चार टँकर द्वारे आग विझवण्याचा अथक प्रयत्न सुरू आहेत. मात्र आग आटोक्यात आली नसून सद्य स्थितीला आग धुमसत आहे.

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीमुळे शेजारच्या आठ दुकानांना आगीने वेढले असून दुकाने जळून खाक झाली आहेत. यात व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग काही प्रमाणात आटोक्यात आली असून आग धुमसत आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही,किंवा जखमी झाले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2018 6:51 pm

Web Title: fire at pimpri chinchwad
टॅग : Fire
Next Stories
1 पार्किंग धोरणाविरोधात पुणे महापालिकेवर सर्वपक्षीय मोर्चा
2 नवजात बाळाचा मृतदेह हातात घेऊन वडील मागत होते न्याय !
3 विधवा, घटस्फोटित महिलांना पिंपरी पालिकेचा मदतीचा हात
Just Now!
X