सहकारी बँकेच्या संचालकपदी अपात्र ठरविण्याच्या प्रक्रियेत अनेकदा पुढे ढकलण्यात आलेली माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची सुनावणी गुरुवारी होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पवार यांच्या वतीने त्यांचे वकील जिल्हा सहनिबंधकांकडे बाजू मांडतील.
सहकारी बँकांमधील आर्थिक अनियमिततेच्या कारणास्तव रिझव्र्ह बँकेच्या निर्देशांनुसार बरखास्त करण्यात आलेल्या संचालक मंडळातील व्यक्तींना पुढील दहा वर्षे निवडणुकांसाठी बंदी घालणे व सध्या इतर सहकारी बँकेत संचालक असल्यास ते अपात्र ठरविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटपातील गैरप्रकारांबाबत रिझव्र्ह बँकेने कारवाई करीत २००१ मध्ये बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. या संचालक मंडळात अजित पवार यांच्यासह खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचाही समावेश होता. पवार यांना याबाबत १८ फेब्रुवारीला नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार ही सुनावणी होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 26, 2016 12:43 am