केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा निर्वाळा

पुणे : करोना संसर्गाच्या काळातील स्तनपान हा नवजात आई आणि बाळाच्या कु टुंबीयांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे, मात्र ज्या आईला करोना संसर्ग झाला आहे तिने बाळाला स्तनपान देणे सुरक्षित असल्याचे के ंद्रीय आरोग्य आणि कु टुंब कल्याण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र स्तनपान देऊन झाल्यानंतर बाळ आणि आई यांना शक्य तेवढे दूर ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.

करोना महासाथीच्या काळातील गरोदर माता आणि नवजात बालकांची सुरक्षितता यांबाबत नागरिकांच्या मनात शंका आहेत. गरोदर महिलेने करोना प्रतिबंधक लस घ्यावी की नको, लस घेतल्यानंतर स्तनपान करावे की नाही, करोनाचा संसर्ग झाला असता बाळाला संसर्ग होण्याचा धोका आहे का, अशा अनेक स्वाभाविक शंकांचे के ंद्रीय आरोग्य आणि कु टुंब कल्याण मंत्रालयाने निरसन करण्याचा प्रयत्न प्रसिद्धिपत्रकाद्वारे के ला आहे. आईला करोनाचा संसर्ग झाला, तरीही बाळ स्तनपानापासून वंचित राहू नये. मात्र, स्तनपानाव्यतिरिक्त त्याला आईपासून दूर ठेवावे असे सांगून करोना काळातील स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

करोना संसर्ग झालेल्या आईने बाळाला स्तनपान देण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. मुखपट्टीचा वापर करावा. बाळाला स्तनपान देण्यापूर्वी आजूबाजूला असलेले पृष्ठभाग र्निजतूक करावेत. त्यानंतर कु टुंबातील करोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीने बाळाचा सांभाळ करावा. बाळाचा सांभाळ करण्यास कु टुंबातील सदस्य नसल्यास आईने पूर्णवेळ मुखपट्टीचा वापर करून बाळाबरोबर राहावे, मात्र स्तनपानाची वेळ सोडल्यास बाळापासून सुरक्षित अंतर ठेवून राहावे, असेही आरोग्य आणि कु टुंब कल्याण मंत्रालयाने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट के ले आहे.