News Flash

राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस पुणे दौर्‍यावर!

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्व; बैठकांचा कार्यक्रम ठरला

या तीन दिवसीय दौऱ्यात शहरातील चारही भागात पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे संवाद साधणार आहेत. (संग्रहीत छायाचित्र)

आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १९ ते २१ जुलै असे तीन दिवस पुणे दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात आजीमाजी पदाधिकाऱ्यांशी राज संवाद उपक्रमा अंतर्गत राज ठाकरे हे संवाद साधणार आहेत. अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बाबू वागसकर म्हणाले की, पुणे शहराच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर राज ठाकरे येत असून राज संवाद उपक्रमा अंतर्गत, सोमवारी १९ जुलै रोजी सकाळी १० ते १ वेळेत वडगाव शेरी आणि शिवाजीनगर मतदारसंघाची सेनापती बापट रोडवरील, इंद्रप्रस्थ कार्यालय येथे बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ४ वेळेत कोथरूड आणि खडकवासला माणिक बाग पेट्रोल पंपा समोरील, परिणय मंगल कार्यालयात होणार आहे. तर दुसर्‍या दिवशी मंगळवारी २० जुलै रोजी सकाळी १० ते १ वेळेत हडपसर आणि कॅन्टोन्मेंट विभागाची कोंढवा खुर्द येथील लोणकर लान्स येथे बैठक होणार असून, १ ते ४ दरम्यान कसबा आणि पर्वती विभागाची बिबवेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक होणार आहे.

दोन दिवसात शहरातील चारही भागात बैठका राज ठाकरे घेणार आहेत. त्या दरम्यान प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेणार असल्याने, पुढील निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे जात आहे. तर दौऱ्याच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच बुधवारी करोना काळात ज्या संस्थांनी चांगले काम केले आहे. त्यांच्याशी विशेष संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 4:09 pm

Web Title: mns president raj thackeray on a three day visit to pune msr 87 svk 88
टॅग : Raj Thackeray
Next Stories
1 पुणे : तापलेल्या रॉडने वार, नंतर पोलिसांना फोन…; वीटभट्टी ते हॉटेल ‘माणुसकी’… वाचा कुठे काय घडलं?
2 चाकण : प्रेमप्रकरणामधून दुहेरी हत्याकांड; प्रियकराची पत्नी, प्रेयसीच्या वडिलांनी केलेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू
3 चाकणमध्ये ऑनर किलींग : दोन तरुणांचा मृत्यू; मुलीच्या वडिलांसहीत सहा जण पोलिसांच्या ताब्यात
Just Now!
X