News Flash

येरवडा कारागृहात मोबाइल सापडला – कारागृह प्रशासनाकडून चौकशी सुरू

हा मोबाइल चालू स्थितीतील असून त्याच्यामध्ये सीमकार्डही मिळून आले आहे. त्यामुळे वापर करून हा मोबाइल फेकून दिला आहे. कारागृहात जाताना कैद्यांची कसून चौकशी केली जाते.

| September 15, 2013 02:40 am

 नाशिक कारागृहात मोबाइल सापडल्याचे प्रकरण ताजे असताना पुण्यातील येरवडा कारागृहात शुक्रवारी दुपारी सर्कल तीनमध्ये फेकून दिलेला मोबाइल येथील कर्मचाऱ्यांना सापडला. ‘हा मोबाइल कोणी आणला, तो आत कसा आला याची कारागृह प्रसासनाने चौकशी सुरू केली आहे,’ अशी माहिती येरवडा कारागृहाचे पोलीस अधीक्षक योगेश देसाई यांनी दिली.
येरवडा कारागृहात संशयित दहशतवादी कतिल सिद्दीकीचा खून झाल्यानंतर येथील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. मात्र, कारागृहातील शिपायांना शुक्रवारी दुपारी सर्कल तीनमधून जाताना जमिनीवर एक मोबाइल आढळून आला. त्यांनी तत्काळ याची माहिती वरिष्ठांना कळवून मोबाइल कारागृह प्रशासनाकडे जमा केला. हा मोबाइल चालू स्थितीतील असून त्याच्यामध्ये सीमकार्डही मिळून आले आहे. त्यामुळे वापर करून हा मोबाइल फेकून दिला आहे. कारागृहात जाताना कैद्यांची कसून चौकशी केली जाते. तरीही हा मोबाइल कोणी आणला, तो कारागृहात कसा आला याचा तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच येरवडा कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ तपासणीत गांजा मिळाला होता. आता थेट कारागृहात मोबाइल आढळून आल्यामुळे येथील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच कारागृहामध्ये मोबाइल जॅमर बसविण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र, त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 2:40 am

Web Title: mobile founded in yerwada jail
टॅग : Mobile,Yerwada Jail
Next Stories
1 गणेशोत्सवात सोनसाखळी चोरटय़ांचा धुमाकूळ
2 सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीने रौप्यमहोत्सवी पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन
3 शिक्षण मंडळाची अनास्था; वीजबिलात लाखोंचा फटका
Just Now!
X