News Flash

पुण्यात 11 हजार विद्यार्थ्यांकडून मनाच्या श्लोकांचे सामूहिक पठण

परशुरामभाऊ महाविद्यालयात पार पडला उपक्रम

पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात आज 11 हजार 631 विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे मनाच्या श्लोकांचं पठण करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकरता प्रयत्न केला. हजारो पुणेकरांना हा अनोखा कार्यक्रम अनुभवण्याची संधी मिळाली. पुणे शहर आणि उपनगरातील 64 शाळांचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.

निनाद पुणे, ओरायन स्टुडिओज, समर्थ व्यासपीठ आणि द्वारका साऊंड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. समर्थ व्यासपीठ पुणेचे डॉ.राम साठये यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी उपयुक्त निवडक 21 मनाचे श्लोक आणि पाठाची निर्मीती मनशक्ती संस्थेने केली. संगीतकार आशिष केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी 21 मनाचे श्लोक सादर केले. जागतिक विक्रमासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि संस्थांशी समन्वयक म्हणून मिलिंद वेर्लेकर यांनी काम पाहिले. यावेळी भगवे झेंडे हातात घेऊन विद्यार्थ्यांनी जय जय रघुवीर समर्थचा जयघोष केला. तसेच यावेळी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यातील शहिदांना आदरांजली देखील अर्पण करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 3:51 pm

Web Title: more than 11 thousand students tries to create record after chanting manache shlok
Next Stories
1 हिंजवडीतील संगणक अभियंता तरुणीकडे व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओची मागणी
2 थकबाकी वसुली न झाल्यास पालिकेचे अंदाजपत्रक कागदावरच!
3 स्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास
Just Now!
X