04 March 2021

News Flash

दोन हजारांपेक्षा जास्त भक्तांनी घेतलं दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते महाआरती

करोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर मागील आठ महिन्या पासून सर्व मंदिरे बंद होती. अखेर आजपासून सर्व मंदिरे भाविकांसाठी उघडी करण्यात आली असून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सकाळपासून भाविकांनी एकच गर्दी केली होती. येणारा प्रत्येक भाविक सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करताना दिसले. आज सुमारे २ हजारांपेक्षा जास्त भाविकांनी गणपतीचे दर्शन घेतलं.

याच दरम्यान भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यावेळी जवळपास ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकाराचे सोशल डिस्टंन्सिंगचे पालन केले नाही किंवा मास्क देखील अनेकांनी वापरले नव्हते. यावर मुळीक यांना विचारले असता, भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करूनच दर्शन घेतले आहे. तसेच येथे गर्दी होणे हे राज्य सरकारचे अपयश असल्याचा अजब दावा त्यांनी केला आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील महाआरतीला शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी जगदीश मुळीक म्हणाले की, देशभरातील करोना आजाराची परिस्थिती आटोक्यात येत आहे. मात्र त्या दरम्यान आपल्या राज्यातील सर्व गोष्टी लवकरच सुरू होण्याची आवश्यकता होती. त्यासाठी आम्हाला अनेक वेळेला आंदोलन करावे लागले आहे. त्या आमच्या आंदोलनास यश आले असून आजपासून मंदिरे खुली झाली आहे. त्या बद्दल आम्ही आनंदी आहे. राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 10:59 am

Web Title: more than two thousand devotees took darshan of dagdusheth halwai ganapati pune scj 81 svk 88
Next Stories
1 मुंबईची दिवाळीतील हवा पुण्यापेक्षाही शुद्ध
2 पुण्यात दिवसभरात १५३ नवे करोनाबाधित, चौघांचा मृत्यू
3 घरी सोडतो सांगून तरुणीला लॉजवर नेऊन बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना
Just Now!
X