News Flash

मुंबईची अपर्णा अगरवाल सीएस फाउंडेशनमध्ये द्वितीय

राष्ट्रीय पातळीवर या परीक्षेत ७०.२२ टक्के  विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

(संग्रहित छायाचित्र)

इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरिज ऑफ इंडियातर्फे  (आयसीएसआय) घेण्यात आलेल्या कं पनी सचिव (सीएस) अभ्यासक्रमाच्या फाउंडेशन परीक्षेत मुंबईतील अपर्णा अगरवालने संयुक्त द्वितीय क्रमांक मिळवला. तर राष्ट्रीय पातळीवर या परीक्षेत ७०.२२ टक्के  विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

आयसीएसआयकडून सोमवारी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. २६ व २७ डिसेंबरला ही परीक्षा घेण्यात आली होती. बेंगळुरूच्या बालाजी बी. जी. या विद्यार्थ्यांने राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला. तर, जबलपूरच्या प्रिया जैन, मुंबईतील भाईंदर येथील अपर्णा अगरवाल यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक मिळवला. भुवनेश्वरची निकिता जैन आणि कोलकाता येथील चिराग अगरवाल यांनी संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांना www.icsi.edu या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल, गुणपत्रिका डाऊनलोड करता येईल. सीएस फाउंडेशनची पुढील परीक्षा पाच व सहा जूनला होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 12:39 am

Web Title: mumbai aparna agarwal is second in cs foundation abn 97
Next Stories
1 मेट्रोच्या कामामुळे पूर पातळीत वाढ
2 मांसाहार, धूम्रपान केल्यास करोनाची शक्यता अधिक!
3 पोटगीच्या दाव्यात पती, पत्नीने उत्पन्नाचे स्त्रोत दाखवणे बंधनकारक
Just Now!
X