पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ३०३ रुग्ण आढळल्याने १ लाख ६० हजार ६७७ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ४ हजार १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ४६३ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ५० हजार ८२३ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १८२ करोना बाधित रुग्ण आढळले असून तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ३१५ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ८७ हजार ४३३ वर पोहचली असून पैकी ८४ हजार १२५ जण करोनातून बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ९११ येवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.