बाणेर येथे एका व्यक्तीच्या भूखंडावर अतिक्रमण करून रस्त्याची अडवणूक केल्याच्या आरोपावरून आमदार विनायक निम्हण, त्यांचा मुलगा नगरसेवक सनी निम्हण यांच्यासह इतर तिघांवर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या रविवारी एका विंग कमांडरला मारहाण केल्याच्या आरोपावरून निम्हण व त्यांच्या मुलावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
याबाबत विनय सुदाम कुंजीर (वय ४५, रा. साई चौक, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून आमदार निम्हण व इतर चौघांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२७, ४४७, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती चतु:शृंगी पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील सव्र्हे क्रमांक ३९ येथे कुंजीर यांच्यासह इतर चार ते पाच जणांचे प्लॉट आहेत. या प्लॉटमध्ये निम्हण यांनी अतिक्रमण करून त्यांच्या रस्त्याची अडवणूक केली. त्या ठिकाणी गेल्यानंतर कुंजीर यांना धमकावून मारहाण केली म्हणून त्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर प्लॉटधारकांचे जबाब घेण्यात येणार आहेत, असे पोलीस निरीक्षक सुभाष निकम यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jul 2013 रोजी प्रकाशित
आमदार विनायक निम्हण, सनी निम्हण यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल
बाणेर येथे एका व्यक्तीच्या भूखंडावर अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून आमदार निम्हण, त्यांचा मुलगा नगरसेवक सनी यांच्यासह इतर तिघांवर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

First published on: 13-07-2013 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One more fri on vinayak nimhan and sunny nimhan