News Flash

धक्कादायक.. पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

दोन लहानग्यांचाही समावेश

धक्कादायक.. पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्याचा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सुखसागर नगर परिसरातील गल्ली क्रमांक एक येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील चौघांनी गुरूवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पती-पत्नी आणि दोन लहानग्यांचा यामध्ये समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या धक्कादायक घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अतुल दत्तात्रय शिंदे (३३ वर्ष), जया अतुल शिंदे (३२ वर्ष), ऋग्वेद अतुल शिंदे ( ६ वर्ष) आणि अंतरा अतुल शिंदे ( ३ वर्ष) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या चौघांचे मृतदेह घरात लटकलेल्या स्थितीमध्ये आढळून आले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा आणि आजूबाजूला चौकशी सुरू केली आहे.

अतुल आणि जया यांचा २०१३ मध्ये प्रेम विवाह झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अतुल शिंदे हे आय कार्ड तयार करण्याचा व्यवसाय करीत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2020 8:03 am

Web Title: pune four members of a family commit suicide in pune nck 90
Next Stories
1 उद्योगपतींनी किमान एक तरी प्रकल्प आणावा, त्यावर तातडीने कार्यवाही करु – मुख्यमंत्री
2 विराज जगताप  खून प्रकरण ; जातीय तेढ निर्माण होईल अशा पोस्ट व्हायरल केल्यास कठोर कारवाई
3 करोना पॉझिटिव्ह असूनही अभिनेत्री रुग्णालयातून परतली घरी
Just Now!
X