News Flash

मुदत संपली, रस्ते दुरुस्ती सुरूच

बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्त्यावर मलनिस्सारण विभागाची कामे सुरू आहेत.

रस्ते खोदाईची कामे पुढील आठवडाभर सुरू राहणार

पुणे : शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्ते दुरुस्त करण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतरही रस्त्यांची कामे सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. रस्ते खोदाईची कामे पुढील आठवडाभर सुरू राहणार असल्याने दहा दिवसांत रस्ते दुरुस्त करण्याचा आणि कामे पूर्ण करण्याचा महापालिके चा दावाही फोल ठरला आहे.  त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांच्या त्रासात भर पडणार आहे.

महापालिके च्या पथ, मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा विभागाबरोबच अन्य शासकीय यंत्रणा आणि खासगी कं पन्यांकडून टाळेबंदीच्या काळात सेवा वाहिन्या टाकण्यासाठी प्रमुख रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर खोदाई करण्यात आली. बाजारपेठा खुल्या झाल्यानंतर ग्राहक तसेच वाहनचालकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कु मठेकर, टिळक, शिवाजी रस्ता या मध्यवर्ती भागातील रस्त्यांबरोबरच उपनगरातील रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर खोदाई झाल्याने प्रशासनावर जोरदार टीका झाली. त्यानंतर रस्ते दुरुस्तीची कामे महापालिके कडून हाती घेण्यात आली. तसेच दहा जूनपर्यंत रस्ते दुरुस्ती पूर्ण करण्यात येईल आणि त्यानंतर रस्त्यांची खोदाई के ली जाणार नाही, ही कामे युद्धपातळीवर पूर्ण के ले जातील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. महापालिका आयुक्तांनी दिलेली दहा दिवसांची मुदत संपुष्टात आल्यानंतरही अद्यापही खोदाईची कामे पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे रस्ते दुरुस्तीही अपूर्णच राहिली असल्याचे चित्र शहरात आहे.

बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्त्यावर मलनिस्सारण विभागाची कामे सुरू आहेत. सध्या पाऊसामुळे चिखल होत असून वाहनचालकांच्या अपघाताचा धोका वाढला आहे. रस्ते खोदाईमुळे प्रमुख चौकात वाहतूक कोंडी होत असून वाहतुकीचा वेगही मंदाविला आहे. अद्यापही अनेक विभागांची कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे किमान पुढील आठवडाभर रस्ते खोदाईची कामे सुरूच राहणार आहे. काही विभागांनी तशी मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे के ली आहे. दरम्यान, रस्ते खोदाई आणि दुरुस्तीची ९० टक्के  कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

पावसाळापूर्व कामेही अपूर्ण

ओढे, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण आणि साफसफाई, कल्व्‍‌र्हटची दुरुस्ती, चेंबरची स्वच्छता, पावसाळी गटारांची दुरुस्ती अशी कामेही संथ गतीने सुरू आहेत. शहरातील १ लाख ४५ हजार २०० मीटर लांबीच्या पावसाळी गटारांपैकी ५४ हजार ७६ मीटर लांबीची कामे झालेली नाहीत. २३ हजार ९८० चेंबरपैकी ६ हजार ८९ चेंबरची कामे अपूर्ण आहेत. ३३८ कल्व्‍‌र्हटपैकी ३० कल्व्‍‌र्हटची कामे झालेली नाहीत. महापालिके ने दिलेल्या आकडेवारीवरून ही बाब पुढे आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 1:47 am

Web Title: road works continuing in pune even after the deadline over zws 70
Next Stories
1 पर्यटन महामंडळाची पुणे विभागातील निवासस्थाने सुरू
2 टोमॅटोवर पाच प्रकारच्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव
3 शिक्षणाची टाळेबंदी होऊ नये म्हणून..
Just Now!
X