जिल्ह्य़ातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र, शहरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे शहरातील सर्व शाळा १३ डिसेंबपर्यंत आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील शाळा नोव्हेंबरअखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून  घेण्यात आला. तर, ग्रामीण भागातील शाळा येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासनाकडून शाळा सुरू करण्याबाबत तयारी करण्यात आली होती. मात्र, दिवाळीनंतर शहरात पुन्हा करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शहरात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.