गरिबांना अल्पदरात जेवण देण्याच्या उद्देशाने आज, रविवार प्रजासत्ताक दिनापासूनपासून (२६ जानेवारी) पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मिळून ११ ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता पुणे महानगरपालिकेतील उपाहारगृहात उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवार यांनी शिवथाळी नाकारली. पण, असं करण्यामागचं योग्य कारणही त्यांनी दिलं.