News Flash

धक्कादायक! : आजाराला कंटाळून ८५ वर्षीय वृद्धाची पेटवून घेऊन आत्महत्या

गंभीर बाब म्हणजे ते एकटेच होते त्यांना पत्नी मुलं असे जवळचे कोणी नातेवाईक नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

पिंपरी-चिंचवडमधील खराळवाडी परिसरात ८५ वर्षीय वृद्ध व्यक्तीने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री हा सर्व प्रकार घराच्या शेजारी असणाऱ्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रुपचंद धोंडीराम सुंदेचा असे आत्महत्या करणाऱ्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री घराच्या बाहेर येऊन वृद्ध रुपचंद यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. या घटनेत ते ७३ टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

गेल्या काही वर्षांपासून ते दुर्धर आजाराने ग्रस्त होते. गंभीर बाब म्हणजे ते एकटेच होते त्यांना पत्नी मुलं असे जवळचे कोणी नातेवाईक नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. आजाराला कंटाळून त्यांनी सोमवारी मध्यरात्री उशीरा पेटवून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2019 4:39 pm

Web Title: shocking a 85 year old man committed suicide with self fired due to long illness
Next Stories
1 हातात कोयता घेऊन १० सेकंदाचा ‘टिक-टॉक’ व्हिडिओ, पिंपरीच्या तरुणाला अटक
2 नामांकित शाळांतील शिक्षकही अतिरिक्त
3 लालचुटूक चेरीचा हंगाम सुरू!
Just Now!
X