करोना विषाणूंचे रुग्ण पुणे विभागात मोठ्या प्रमाणात आढळत असून आता ही संख्या ११ हजार ८६ इतकी झाली आहे. तर एकूण ५११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ६ हजार २४१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, “पुणे जिल्हयात ८ हजार ६०४ बाधीत रुग्ण असून आतापर्यंत ५ हजार २०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एकूण ३८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात ५७८ रुग्ण असून ३३४ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयात १,१३५ रुग्ण असून ४७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात १२४ रुग्ण असून ७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात ६४५ रुग्ण असून २६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.