News Flash

पिंपरी-चिंचवड : बांधकाम सुरु असलेल्या मंदिराचा स्लॅब कोसळला; एका महिलेसह तिघांचा मृत्यू

पिंपळे गुरव येथील रहिवाशी भागात ही घटना घडली आहे, जखमींना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड : बांधकाम सुरु असलेल्या एका मंदिराच्या सभामंडपाचा स्लॅब कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे.

बांधकाम सुरु असलेल्या एका मंदिराच्या सभामंडपाचा स्लॅब कोसळल्याने त्याखाली अडकून एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर इतर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पिंपळे गुरव येथील रहिवाशी भागात ही घटना घडली आहे. जखमीला जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, चिदम्मा पुजारी (वय ३०), मंतोष संजीत दास ( वय ३०) आणि प्रेमचंद शिबू राजवार (वय ३५) अशी या दुर्घटनेतील मृतांची नावे आहे. पिंपळे-गुरव भागात महादेवाचे मंदिर बांधण्याचे काम सुरु आहे. बुधवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास मंदिराचा सभा मंडप दगडी खांबासह खाली कोसळला यावेळी या तिघांसह एक जण तिथे काम करीत होते. हे काम सुरु असतानाच सभा मंडपाचा स्लॅब त्यांच्या अंगावर कोसळला. पारंपारिक पद्धतीने या मंदिराचे बांधकाम सुरु होते, त्यासाठी एकावर एक खांबाचा भाग रचून वर चढवला जात होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2019 4:52 pm

Web Title: two died due to the slab of the construction temple collapsed at pimpri chinchwad
Next Stories
1 तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ; पतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात
2 एकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही
3 भाजपमुळेच पुण्याचा विकास
Just Now!
X