News Flash

“गाडी विकून आईला पैसे द्या”.. असा व्हाईस मेसेज पाठवून तरुणाची खडकवासला धरणात उडी मारून आत्महत्या

आज सकाळच्या सुमारास मृतदेह धरणात तरंगताना आढळला

(संग्रहीत छायाचित्र - खडकवासला धरण)

गाडी विकून आईला पैसे द्या, तिची काळजी घ्या. असा व्हाईस मेसेज चुलत भावाच्या मोबाईलवर पाठवून, पुणे शहरातील एका व्यवसायिक तरुणाने खडकवासला धरणात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चंद्रशेखर गोपाळ पुजारी (वय 31, रा. सोमवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर पुजारी हा तरुण सोमवार पेठ परिसरात राहत होता. तो एक व्यावसायिक होता. गुरुवारी मध्यरात्री घरात कोणालाही न सांगता तो निघून गेला होता. त्यानंतर घरातील सर्वांनी चंद्रशेखर याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तो काही सापडला नाही. अखेर कुटुंबीयांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दिली.

मात्र त्याच दरम्यान चंद्रशेखर पुजारी या तरुणाने त्याच्या चुलत भावाच्या मोबाईलवर माझी गाडी खडकवासला धरणाजवळ लावलेली आहे. मी आत्महत्या करीत असून माझी गाडी विकून जे पैसे येतील. ते माझ्या आईला द्या आणि माझ्या आईची काळजी घ्या, अशा स्वरूपाचा व्हाईस मेसेज पाठवला. त्यानंतर घरातील व्यक्तींनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तोवर त्याने आत्महत्या केली होती. तसेच आज सकाळच्या सुमारास धरणात मृतदेह तरंगताना दिसला. मात्र त्या तरुणाने आत्महत्या कोणत्या कारणाने केली. हे अद्याप पर्यंत समजू शकले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 9:55 pm

Web Title: young man commits suicide by jumping into khadakwasla dam msr 87 svk 88
Next Stories
1 ….जेव्हा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ‘मटणवाले चाचा’ बनून पोलीस ठाण्यात पोहोचतात
2 “मी पुण्यात आल्यावर अदर पूनावालाला फोन केला तेव्हा…,” अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
3 मराठा आरक्षण : “सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक ; गरज पडल्यास एकदिवसीय अधिवेशन बोलावणार !”
Just Now!
X