लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : विमाननगर भागातील रोहन मिथिला इमारतीच्या परिसरात बांधकाम मजुरांच्या वसाहतीत बुधवारी दुपारी आग लागली. आगीत तात्पुरत्या बांधण्यात आलेल्या घरांमध्ये ठेवलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. एकापाठोपाठ दहा सिलिंडरचे स्फोट झाल्याने घबराट उडाली.

विमाननगर भागातील सिंबायोसिस कॉलेजजवळ रोहन मिथिला इमारत आहे. या परिसरात नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. तेथे बांधकाम मजूर राहायला आहेत. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास बांधकाम मजुरांच्या वसाहतीत (लेबर कॅम्प) आग लागली. आग लागल्यानंतर घरातील गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. स्फोटानंतर परिसरात घबराट उडाली. वसाहतील महिला आणि मुले बाहेर पळाल्याने बचावली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वसाहतीतील छोट्या घरात जवळपास १०० सिलिंडर ठेवण्यात आले होते. त्यापैकी दहा सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आणखी वाचा-पिंपरी: देहूरोड, दिघी रेडझोन हद्दीचा अचूक नकाशा प्रसिद्ध होणार, महापालिकेने घेतला ‘हा’ निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गॅस सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट झाल्याने परिसरात घबराट उडाली. स्फोटामुळे परिसरात अफवा पसरली. आगीत बांधकाम मजुरांची घरे जळाली. गृहोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले.