पुणे : महापालिकेच्या आस्थापनावरील वर्ग एक ते वर्ग तीन संवर्गातील रिक्त ३२० पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येणार आहेत. या रिक्तपदांच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. २२ जून आणि २ जुलै रोजी परीक्षा तीन सत्रात होणार आहे.
क्ष किरण तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, उपसंचालक (प्राणी संग्रहालय), पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता (विद्युत विभाग), अग्निशमन विमोचन आणि फायरमन या पदासाठी २२ जुलै रोजी परीक्षा होणार आहे.

हेही वाचा >>> पुणे: कारवाईच्या इशाऱ्यानंतर एका दिवसात ‘असा’ तयार झाला जाहिरात फलकांचा स्थापत्य लेखापरीक्षण अहवाल

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
set exam date marathi news, set exam 7th april marathi news
‘सेट’ परीक्षा ७ एप्रिल रोजी, मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार
Job Opportunity Recruitment of License Inspector Posts
नोकरीची संधी: अनुज्ञापन निरीक्षकपदांची भरती

आरोग्य निरीक्षक, वाहन निरीक्षक, पशु वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक पदासाठी २ जुलै रोजी परीक्षा होणार आहे. या सर्व पदांसाठी १० हजार १७१ अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले असून ३२० जागांची भरती करण्यात येणार आहे. परीक्षा तीन सत्रात होणार असून उमेदवारांना परीक्षेच्या सात दिवस आधी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना भ्रमणध्वनी लघुसंदेश आणि ई-मेलद्वारे माहिती पाठविण्यात येणार आहे. महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र मिळविता येणार आहे. परीक्षा केंद्र, दिनांक आणि कालावधी यांचा तपशील प्रवेशपत्रावर नमूद करण्यात येणार आहे.